महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अकरा महिन्यात 3.89 कोटींचा ड्रग्ज जप्त

03:19 PM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

152 संशयितांना अटक, स्थानिक युवक ड्रग्जकडे ओढला जात असल्याने चिंतेची बाब 

Advertisement

पणजी : गोवा पोलीस खात्याच्या विविध विभागांनी गेल्या अकरा महिन्यात केलेल्या कारवाईत तब्बल 3 कोटी 89 लाख 59 हजार 580 ऊपये किमंतीचा 158. 285 किलो ग्रॅम विविध प्रकारचा ड्रग्ज जप्त केला आहे. एकूण 127 तक्रारी नोंद केल्या आहेत तर 152 संशयितांना अटक केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ड्रग्ज प्रकरणे कमी झाल्याचे दिसून येत आहे ती एक जमेची बाजू असली तरी स्थानिक युवक ड्रग्ज प्रकरणाकडे ओढला जात आहे ही एक चिंतेची बाब आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत म्हणजे जानेवारी ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत 183.469 किलो ग्रॅम विविध प्रकारचा ड्रग्ज जप्त केला होता. एकूण  135 तक्रारी नोंद केले हेते तर 164 संशयितांना अटक केली होती. त्यात 48 गोमंतकीय 90 परप्रंतीय आणि 26 विदेशी नागरीकांचा समावेश आहे. यावर्षी 152 संशयितांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली असली तरी त्यात 45 संशयित गोमंतकीय आहेत. 90 संशयित परप्रांतीय तर 17 संशdियात विदेशी आहेत.

Advertisement

काही वर्षापूर्वी ड्रग्ज व्यवसायात केवळ विदेशी लोका असल्याचे दिसून येत होते. मात्र गेल्या काही वर्षापासून या व्यवसायत स्थानिक लोकही असल्याचे आढळून आले आहे. त्यांनी हे विष संपूर्ण गोवाभर पसरवीले असून उत्तर गोव्यातील कीनारी भागात त्यांचा चांगला जम बसल्याचे दिसत आहे. स्थानिक युवक 20 ते 35 वयोगटातील युवक या व्यवसायात अधिक प्रमाणात असल्याचे समजते. झटपट पैसा मिळविण्याचे साधन म्हणून ड्रग्ज व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र त्याच्या परिणामाचा विचार करीत नसल्याचे दिसून येते. वाढती बेकारी त्यात बदलत्या काळातील आधुनिक रहाणीमानाप्रमाणे जगाचे असल्या भरपूर पैसा पाहिजे तो सहज आणि सोप्या रितीने मिळविण्यासाठी युवा वर्ग या घातक व्यवसायाकडे वळतात त्यांच्यावर ताबा ठेवणे काळाची गरज आहे.

पोलीस खात्यातील अमली पदार्थ विरोधी विभाग (एएनसी) यांच्यासह विविध पोलीस स्थानके व गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस ड्रग्ज विरोधी कारवाई करीत असतात केवळ कारवाई करण्यापर्यंतच मर्यादीत राहत नसून ड्रग्स विरोधात शाळा कॉलेज मधून जनजागृती केली जाते विविध स्पर्धांचे आयोजन करून युवकांनी ड्रग्जपासून दुर कसे रहावे त्याबाबत तसेच ड्रग्जमुळे होणारे घातक परिणाम याची माहिती दिली जाते. या सारख्या पोलीस खात्याच्या प्रयत्नामुळे या वर्षी ड्रग्ज प्रकरणे कमी झाली असल्याचे नाकारले जाऊ शकत नाही. त्याच बरोबर केंद्रातील एनसीबीने या वर्षी अनेक मोठ्या कारवाया केल्या असून परदेशातून किंवा देशातील अन्य भागातून गोव्यात येऊ पहाणाऱ्या ड्रग्जला वेळओवेळी रोखून धरले आहे. पोलीसांनी कारवाई करावीच मात्र युवक ड्रग्जप्रकरणाकडे वळमारच नाही यासाठी काही ठोस उपाययोजना करणे फास महत्वाचे आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article