इराणमध्ये एकाच दिवसात 29 जणांना फाशी
07:00 AM Aug 09, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
तेहरान : इराणमध्ये बुधवारी 29 जणांना फासावर लटकविण्यात आले आहे. तेहरानबाहेर गेजलहसर तुरुंगात 26 जणांना तर उर्वरित 3 जणांना करज शहरातील तुरुंगात फाशी देण्यात आली. फासावर लटकविण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये दोन अफगाण नागरिकांचा समावेश आहे. त्यांच्यावर हत्या, अमली पदार्थांची तस्करी आणि बलात्काराचे आरोप होते. कुणाचाच दबाव नसल्याने आगामी काळात शेकडो लोकांना इराण सरकार फासावर लटकवू शकते. 2009 नंतर पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येत लोकांना फासावर लटकविण्यात आल्याचे आयएचआर या मानवाधिकार संघटनेचे संचालक महमूद अमीरी मोगद्दम यांनी सांगितले. यापूर्वी या संघटनेने एका इसमाला फासावर लटकविण्यात आल्याप्रकरणी टीका केली होती. या इसमाला रिव्होल्युशनरी गार्डच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article