For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हसदेव नदीनजीक मिळाला प्राचीन सागरी जीवाश्म

06:45 AM Jan 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
हसदेव नदीनजीक मिळाला प्राचीन सागरी जीवाश्म
Advertisement

महेंद्रगढमध्ये साकारणार फॉसिल्स पार्क छत्तीसगडचा महेंद्रगढ जिल्हा आता इतिहास आणि निसर्गप्रेमींसाठी नवे आकर्षण ठरत आहे. येथील हसदेव नदीच्या काठावर 28 कोटी वर्षे जुना सागरी जीवाश्म मिळाला असून या पार्श्वभूमीवर छत्तीसगड सरकार एक मरीन फॉसिल्स पार्क विकसित करण्याची तयारी करत आहे. हे पार्क केवळ छत्तीसगड नव्हे तर पूर्ण आशियासाठी गौरवाचे केंद्र ठरणार आहे.

Advertisement

महेंद्रगढचा हा जीवाश्म कोट्यावधी वर्षे जुना आहे. जीवाश्मांमध्ये बाइवाल्व मोलस्का, युरीडेस्मा, एवीक्युलोपेक्टेन आणि क्रिनॉएड्स यासारख्या सागरी जीवांचे अवशेष मिळाले आहेत. जे पृथ्वीवरील गत हवामान आणि भूगर्भीय बदलांचे पुरावे देत आहेत.

28 कोटी वर्षांपूर्वी सध्याच्या हसदेव नदीच्या ठिकाणी एक विशाल ग्लेशियर असायचा. भूभर्गीय बदलांमुळे हे क्षेत्र ‘टाथिस समुद्रा’चा हिस्सा झाले आणि सागरी जीव-जंतू येथपर्यंत पोहोचले. परंतु हे जीव कालौघात विलुप्त झाले, परंतु त्यांचे अवशेष आजही येथे आहेत.  1954 मध्ये पहिल्यांदा या क्षेत्रात संशोधन भूवैज्ञानिक एस.के. घोष यांनी केले होते. यानंतर 2015 मध्ये बीरबल साहनी इन्स्टीट्यूट ऑफ पॅलियो सायन्सेस, लखनौने या जीवाश्मांच्या महत्त्वाची पुष्टी दिली. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने (जीएसआय) 1982 मध्ये या क्षेत्राला नॅशनल जियोलॉजिकल मोनुमेंट्सच्या स्वरुपात मान्यता दिली.

Advertisement

मरीन फॉसिल्स पार्कच्या स्वरुपात विकसित झाल्यावर हे क्षेत्र एक बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साइटच्या स्वरुपात पर्यटक आणि वैज्ञानिकांसाठी खुले होईल. येथे येणारे पर्यटक कोट्यावधी वर्षे जुन्या जीवांची उत्पत्ती आणि त्यांच्या विकासाची कहाणी पाहू अन् समजू शकतील. छत्तीसगड सरकार या प्रकल्पाला विशेष महत्त्व देत आहे. जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, कोलकाता आणि बीरबल साहनी इन्स्टीट्यूटच्या टीम्सनी या क्षेत्राचे अध्ययन करत याच्या शक्यतांचा आढावा घेतला आहे.

Advertisement
Tags :

.