For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पळशी बंधाऱ्यात पडून 28 वर्षीय युवक बेपत्ता

01:29 PM May 29, 2025 IST | Radhika Patil
पळशी बंधाऱ्यात पडून 28 वर्षीय युवक बेपत्ता
Advertisement

म्हसवड :

Advertisement

प्रचंड पावसाने माण तालुक्यातील माणगंगा नदीला पूर आला आहे. या नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सोमवारपासून पावसाचा जोर ओसरत असताना पळशी येथे दुर्घटना घडली. पळशी येथील नवनाथ पाटोळे (वय 23) व त्याचा मित्र उमेश चव्हाण हे झाशी येथे मंगळवारी एका कार्यक्रमाचे जेवण करून बंधाऱ्यावरुन घराकडे माघारी येत होते. त्यावेळी नवनाथचा पाय घसरून बंधाऱ्यात पडून तो बेपत्ता झाला. बुधवारी दिवसभर नवनाथची शोधमोहीम नदीपात्रात सुरू होती. मात्र तो सापडला नाही. माणचे प्रशासन बंधाऱ्यालगत तळ ठोकून आहे. एनडीआरएफच्या पथकाची मागणी करण्यात आली आहे.

माणगंगा नदीवरील पळशी येथील बंधारा भरून वाहत आहे. मंगळवारी पळशी येथील नवनाथ पाटोळे व त्याचा मित्र उमेश चव्हाण हे दोघे झाशी येथील एका नातेवाईकांच्या घरी जागरण, गोंधळाच्या जेवणाच्या कार्यक्रमाला गेले होते. जेवण करून झाशीमधून चालत पळशीकडे माघारी बंधाऱ्यावरुन येत होते. त्यावेळी नवनाथचा पाय घसरून तो पाण्यात पडला. जोडीदार उमेशने त्यास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. नंतर आरडाओरडा करून लोकांना गोळा करून नवनाथचा शोध रात्री उशिरापर्यंत घेण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच माण महसूल प्रशासन व म्हसवड पोलीस घटनास्थळी हजर झाले. रात्री अंधार व पावसाळी वातावरणामुळे शोधमोहीम रात्री बारानंतर थांबवण्यात आली.

Advertisement

आज बुधवारी सकाळी नऊ वाजता म्हसवडचे मुख्याधिकारी सचिन माने यांनी तात्काळ पालिकेची आपत्कालीन रेस्क्यू टिमचे प्रमुख सागर सरतापे, गणेश चव्हाण, संतोष सरतापे, संजय जाधव, प्रवीण पिसे व इतर कर्मचाऱ्यांना घेऊन बोटमधून पाण्यात शोधमोहीम सुरु केली. प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार विकास आहेर, सपोनि अक्षय सोनवणे, नवनाथ श्रीकुळे, अनिल वाघमोडे, सरपंच शांताबाई खाडे उपस्थित होते. ग्रामस्थांनीही मोठी गर्दी केली होती तर बंधाऱ्यालगतच नवनाथ पाटोळे यांचे नातेवाईक, आई, पत्नी, दोन मुलांच्या हंबरड्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

प्रशासनाने सातारा जिल्हाधिकाऱ्यांना घटनेची माहिती एनडीआरएफ पथकाची मागणी केली. दिवसभरात एनडीआरएफ आले नसल्याने म्हसवड पालिकेच्या रेस्क्यू टीमच्या वतीने बुधवारी रात्री सातपर्यंत शोधमोहीम सुरु होती. सपोनि अक्षय सोनवणे, पोलीस कर्मचारी नवनाथ श्रीकुळे, अनिल वाघमोडे, देवा खाडे, विकास ओंबासे हे स्वत: बोटीत बसून शोधकार्य करत होते. गावातील प्रग्यांक खाडे, नारायण जाधव, खरे, मानसिंग खाडे, अशोक नाकाडेसह त्यांचे नातेवाईक शोधा शोध करत होते.

Advertisement
Tags :

.