For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

28 संभाव्य हॉकीपटूंची घोषणा

06:30 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
28 संभाव्य हॉकीपटूंची घोषणा
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर 12 ते 30 मार्च दरम्यान हॉकी इंडियातर्फे आयोजित केलेल्या वरिष्ठ पुरूष हॉकीपटूंच्या राष्ट्रीय सराव शिबिराकरीता 28 संभाव्य हॉकीपटूंची यादी घोषित करण्यात आली आहे.

2024 ची पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा जुलै-ऑगस्ट दरम्यान होणार असल्याने या स्पर्धेकरीता पूर्वतयारी म्हणून हॉकी इंडियाने हे राष्ट्रीय सराव शिबिर आयोजित केले आहे. 2023-24 च्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या हॉकी प्रो-लीग स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्यानंतर भारतीय हॉकी संघातील खेळाडू आता भुवनेश्वरच्या सराव शिबिरात दाखल होणार आहेत. हॉकी प्रो-लीग स्पर्धेत भारतीय संघ गुणतक्त्यात 8 सामन्यातून 15 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहेत. आता हॉकी प्रो-लिग स्पर्धेला 22 मेपासून बेल्जियममध्ये पुन्हा प्रारंभ होणार आहे. बेल्जियममधील हा हॉकी प्रो-लीगचा अंतिम टप्पा राहिल. 1 जूनला भारतीय पुरूष हॉकी संघ लंडनमध्ये दाखल होणार आहे.

Advertisement

या सराव शिबिरासाठी कृष्णन बहाद्दुर पाठक, पी. आर. श्रीजेश, सुरज करकेरा, हरमनप्रित सिंग, जर्मनप्रित सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित, अमिर अली, मनप्रित सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, एम. रवीचंद्र सिंग, समशेर सिंग, निलकांता शर्मा, राजकुमार पाल, विष्णूकांत सिंग, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, ललीतकुमार उपाध्याय, अभिषेक, दिलप्रित सिंग, सुखजित सिंग, गुर्जंत सिंग, मोहम्मद मुसेन, बॉबीसिंग धामी, अरीजितसिंग हुंडाल यांचा यामध्ये समावेश आहे.

Advertisement
Tags :

.