For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

275 वर्षांपूर्वीचे हॉटेल ठरले भीतीदायक

06:13 AM Nov 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
275 वर्षांपूर्वीचे हॉटेल ठरले भीतीदायक
Advertisement

सुटी घालविण्यासाठी लोक परगावी गेल्यावर हॉटेल्समध्ये वास्तव्य करतात. अशास्थितीत हॉटेल स्वच्छ, सुरक्षित ठिकाणी असावे आणि सामान्य सुविधा तेथे मिळाव्यात अशी लोकांची इच्छा असते. परंतु ब्रिटनमध्ये एक असे हॉटेल आहे, जे पाहून लोक तेथे वास्तव्य करण्यास थांबतात, परंतु हे ठिकाण भुताटकीनेयुक्त असल्याचा त्यांचे सांगणे असते. याचमुळे अनेक लोक याला ब्रिटनमधील सर्वात हाँटेड हॉटेल मानतात. हे हॉटेल 275 वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आले होते आणि येथे रात्री शिट्टी वाजवण्याचा आवाज ऐकू येतो असे लोकांचे सांगणे आहे. कॉर्नवॉलमध्ये बॉडमिन मूरच्या उंचीवर असलेले जमैका इन केवळ सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध नसून स्वत:चे भुताटकीनेयुक्त किस्से आणि रहस्यमय इतिहासासाठी देखील ओळखले जाते. 1750 मध्ये निर्मित या हॉटेलचा इतिहास सुमारे अडीचशे वर्षे जुना आहे आणि याला ब्रिटनमधील सर्वात हाँटेड स्थळांपैकी एक मानले जाते. प्रारंभी हे एक कोचिंग इन होते, जेथे प्रवासी आणि अश्वांना आराम करण्याची सुविधा दिली जात होती, परंतु काही दशकांमध्ये हे ठिकाण तस्करीच्या अ•dयाच्या स्वरुपात बदनाम झाले. याची निर्जन स्थिती आणि एकांताचा भाग तस्करांसाठी अत्यंत सुविधाजनक होता. येथे चहा, ब्रँडी आणि रेशमी कपड्यांची तस्करी व्हायची, या सामग्रीला जमिनीखालील गुप्त हिस्स्यांमध्ये लपविले जात होते.

Advertisement

हॉटेलवर चित्रपट

जुने लाकडी बीम, छोट्या खोल्या आणि कमी प्रकाश असलेल्या कॉरिडॉरमुळे हे आजही भय आणि रहस्याची जाणीव करून देते. याच्या भुताटकीयुक्त वातावरणाने 1936 मध्ये प्रसिद्ध इंग्रजी लेखिका डॅफ्ने डू मॉरियर यांना इतके प्रभावित केले की, त्यांनी स्वत:ची प्रसिद्ध कादंबरी ‘जमैका इन’ची प्रेरणा येथूनच घेतली. डू मॉरियर यांची ही कहाणी इतकी लोकप्रिय झाली की नंतर महान दिग्दर्शक अल्फ्रेड हिचकॉक यांनी याच नावाने चित्रपट तयार केला. हा चित्रपट त्यांनी ब्रिटनमध्ये तयार केलेला अखेरचा चित्रपट होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.