तुर्कियेत मिळाले 2700 वर्षे जुने मंदिर अन् गुहा
5 शतकांपर्यंत ऑटोमन साम्राज्याचे केंद्र राहिलेल्या तुर्कियेत पुरातत्वतज्ञांनी 2700 वर्षे जुने मंदिर शोधले आहे. आधुनिक डेनिजली शहरानजीक शोधण्यात आलेल्या मंदिराची निर्मिती फ्रीजियन लोकांकडून झाल्याचे मानले जात आहे. फ्रीजियन लोकांनी या क्षेत्रात सुमारे ख्रिस्तपूर्व 1200 ते 650 सालादरम्यान राज्य केले होते. फ्रीजियन साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध शासक मिडास राहिला आहे. हे मंदिर मातृदेवीला समर्पित राहिलेले असावे, असे पुरातत्वतज्ञांचे मानणे आहे. याचसोबत एक पवित्र गुहाही मिळाली आहे. फ्रीजियन लोकांची एक प्रमुख देवी बहुधा प्रजननक्षमता आणि निसर्गाशी निगडित होती. त्याला अनेक नावांनी ओळखले जात होते, ज्यात मॅटेरन, माटर आणि सायबेले सामील आहे.
मंदिरात मातृदेवीच्या मूर्ती
प्राचीन युनानी आणि रोमन यासारख्या दुसऱ्या संस्कृतींमध्येही मातृदेवीची पूजा केली जात होती आणि फ्रीजियन साम्राज्यानंतर त्याचा पंथ वाढत राहिला. पामुक्काले विद्यापीठातील पुरातत्वाचे प्राध्यापक बिलगे यिलमाज कोलांसी यांनी शोधण्यात आलेल्या पवित्र स्थळामध्ये एक फ्रीजियन रॉक स्मारक, पवित्र गुहा आणि संरचनांदरम्यान जुळ्या दगडाच्या मूर्ती सामील असल्याची माहिती दिली आहे.
2600 वर्षांपेक्षा अधिक जुने मंदिर
मूर्ती खडकाच्या वरील भागातून कोरण्यात आल्या आहेत. या स्थळावर अनेक अर्घ्यदान पात्र आणि पाण्याचे मार्गही आहेत. अर्घ्यदान अनेक प्राचीन सांस्कृतिक विधींमध्ये वापरले जात होते. हे स्थळ जवळपास 2800-2600 वर्षे जुने असल्याची पुष्टी कोलांसी यांनी दिली. दगडात कोरण्यात आलेल्या मूर्तीची झीज मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याविषयी अधिक माहिती मिळू शकत नाही, परंतु त्या स्वत:च्या वर्तमान स्थितीत मिडास सिटी आणि अन्य फ्रीजियन स्थळांवर मिळालेल्या मूर्तीची आठवण करून देणाऱ्या असल्याचे कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राचीन भूमध्यसागरीय कलच्या प्राध्यापिका लिन रोलर यांनी सांगितले आहे.