महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फोंडा तालुक्यात रस्ते अपघातात 27 जणांनी जीव गमावला

12:31 PM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फोंडा : फोंडा तालुक्यातील फोंडा व म्हार्दोळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत सरत्या वर्षात म्हणजेच सन 2023 साली रस्त्यावरील अपघातात एकूण 27 जणांनी जीव गमावला. त्याशिवाय 36 जण गंभीररित्या जखमी व 62 जण किरकोळ जखमावर बचावले. एकूण 157 अपघातांची नेंद केवळ फेंडा पोलीस स्थानकात झालेली आहे. अपघातात सापडलेल्या एकूण 283 वाहनामध्ये सर्वाधिक 130 दुचाकीचा समावेश असून त्याच्या पाठोपाठ 92 चारचाकीचा आहे. तसेच 9 प्रवासी बस, 43 अवजड वाहने, 2 कंटेनर, 2 टॅकर,2 पिकअप, 1 रिक्षा, 1 जेसीबी, 2 क्रेन व 1 एक्सेवेटर अशा वाहनांचा समावेश आहे. फोंडा पोलीस स्थानकाची कार्यक्षेत्रात 19 ग्रामपंचायती व धारबांदोडा तालुक्यातील धारबांदोडा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. मात्र 8 जून 2023 रोजी म्हादोंळ येथे नवीन पोलीस स्थानक उभारण्यात आल्यानंतर फोंडा पोलिसांवर ताण काही अंशी कमी झालेला आहे.

Advertisement

फोंडा शहर व इतर काही पंचायत क्षेत्रामध्ये गेल्या आठ वर्षापासून मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुऊ आहे. बहुतेक रस्ते चेंबरसाठी खोदल्यानंतर त्यांची व्यवस्थितपणे डागडुजी करण्यात आलेली नाही. सद्या  भुमिगत वीजवाहिनीसाठी रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. अपघातांमागील कारण म्हणजे फोंडा तालूक्यातील मागील आठ वर्षापासून वाहतूकीसाठी बनलेले असुरक्षित रस्ते हेही आहे. फर्मागुडी-ढवळी येथील उ•ाणपुलावरील अभियांत्रिकी कौशल्यात फेल ठरलेल्या वळणावर दर महिन्याला अवजड वाहने दुभाजकावर कलंडण्dयाचे अपघात घडत आहे. बांधकाम खात्यातर्फे काही ठिकाणी सुचनाफलक उभारण्यातही कमी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. अपघातात बळी गेल्यानंतर या खात्याला खडबडून जाग येत असते.

Advertisement

म्हार्दोळ पोलीस स्थानक आणि बाणस्तारी येथील मर्सिडीज अपघात 

राज्यात सर्वत्र चर्चेत राहिलेला बाणस्तारी पुलावरील मर्सिडीज  कारचा अपघात सन 2023 चा सर्वात चर्चित अपघाताची घटना ठरली. अपघातात 3 जण मृत्यूमुखी पडले असून 2 जणांना कायमस्वरूपी अपंगत्वाचा सामना करावा लागला. हाय प्रोफायल केसमुळे गोवा पोलिसावरही संपुर्ण जनतेने ताशोरे ओढले. पोलीस उपअधिक्षक व पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या वेगवेगळया जबान्या त्यानंतर तयार झालेला आय विटनेस अशा अनेक कारणामुळे बाणस्तारी अपघात भरपूर गाजला.

अपघातावर नियंत्रण येईना, वाहतूक पोलिसांची मात्र चांदी   

अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी मागील वर्षभरात फोंडा वाहतूक पोलीस विभागाने एकूण 40 हजारहून जास्तजणांना वाहन परवाना व इतर कारणासाठी  दंड वसुल केले. चलनातून सुमारे रूपये 3 कोटीहून अधिक निधी जमा केलेला आहे. वेगमर्यादा, विनाहेल्मेटसाठी दुचाकीचालकांना चलन जारी करण्यात येते तरी अपघातावर नियंत्रण येत नाही. त्याचबरोबर रस्ता सुरक्षा मोहीम वाहतूक पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी राबवित आहे. त्यांनी अनेक ठिकाणी अपघाप्रवण क्षेत्र म्हणून प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवून शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. तरीही अपघातावर नियंत्रण ठेवणे आजपर्यत शक्य झालेले नाही. त्यामुळे सर्वानी वाहतूक नियम पाळून वाहने हाकावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article