महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बस अपघातात नेपाळमध्ये 27 प्रवासी ठार

06:54 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मृतांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश : उत्तर प्रदेशातील बस नदीत कोसळल्याने दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था / काठमांडू, नवी दिल्ली

Advertisement

उत्तर प्रदेशातील एक प्रवासी बस नेपाळमध्ये मर्सियांगदी नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात किमान 27 प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे. बसमधील पर्यटकांपैकी काहीजणांना वाचविण्यात यश आले असले तरी मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मध्य नेपाळमध्ये ही दुर्घटना शुक्रवारी घडली. बसमध्ये वाहक आणि चालकांसह एकूण 43 जण होते अशी माहिती मिळाली आहे. त्यापैकी बहुतांश प्रवासी महाराष्ट्रातील जळगाव जिह्यातील आहेत.

या घटनेत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच 16 लोकांवर उपचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले. याबाबत महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी घटनेची माहिती देताना जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाल्याने अंदाजित 41 पर्यटक हे नेपाळमध्ये दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी गेले होते. त्यांची बस नदीमध्ये कोसळून अपघात झाल्याची माहिती समजल्याचे स्पष्ट केले. मात्र, महाराष्ट्रातील मृतांचा नेमका आकडा आणि नावे उशिरापर्यंत स्पष्ट झाली नव्हती.

अपघातग्रस्त बस उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून नेपाळची राजधानी काठमांडूला जात होती. वाटेत नेपाळमधील तनहून जिल्ह्यातील आईना पहारा येथील महामार्गावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस मर्सियांगदी नामक नदीत कोसळली. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या आसपास घडला.

साहाय्यता कार्य त्वरित

अपघाताचे वृत्त कळताच नेपाळच्या स्थानिक प्रशासनाने अपघातस्थळी आपदा साहाय्यता पथक पाठविले. या पथकातील रक्षकांनी काही प्रवाशांचे प्राण वाचविले. तथापि, अद्याप अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली. त्यांना शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पावसामुळे या नदीला पूर आला आहे. त्यामुळे साहाय्यता कार्यात अडथळे येत आहेत, अशीही माहिती देण्यात आली.

देवदर्शनासाठी प्रवास

उत्तर प्रदेशातील प्रवासी या बसमधून नेपाळची राजधानी काठमांडू येथील जगप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराला भेट देण्यासाठी आणि पशुपतीनाथाचे दर्शन घेण्यासाठी निघाले होते. तथापि, तेथे पोहचण्याआधीच त्यांच्यावर काळाचा घाला पडला आहे. नेपाळच्या आपदा साहाय्यता दलाच्या, तसेच नेपाळ सैन्यदलाच्या ही तुकड्यांनी साहाय्यता कार्य चालविले आहे. 35 पाणबुडेही वाहून गेलेल्या प्रवाशांचा शोध घेत आहेत. वाहून गेलेल्या बसचाही शोध घेण्याचा प्रयत्नही केला जात आहे.

एक महिन्यातील दुसरा प्रकार

गेल्या महिन्यात नेपाळमध्येच भूस्खलन झाल्याने दोन बसेस पूर आलेल्या त्रिशुली नदीत वाहून गेल्या होत्या. दोन्ही बसेसमध्ये मिळून 65 प्रवासी होते. त्यानंतरची ही दुसरी अपघाताची भीषण घटना आहे. या दुर्घटनेत बहुतेक प्रवासी वाहून गेले होते. त्यांचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. त्यामुळे ते जिवंत असण्याची शक्यता नाही, अशी माहिती नेपाळच्या स्थानिक प्रशासनाने त्यावेळी दिली होती.

अतिवृष्टीमुळे पूरस्थिती

सध्या उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पूरस्थितीचा विपरीत परिणाम साहाय्यता कार्यावर होत आहे. वाहून गेलेल्या प्रवाशांना शोधणे कठीण होत आहे, असे साहाय्यता पथकांचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article