For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इटलीतील पर्वतात 2600 वर्षे जुने थडगे

06:22 AM Nov 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
इटलीतील पर्वतात 2600 वर्षे जुने थडगे
Advertisement

चांदीचे केस, 4 सांगाडे, नक्षीदार दगडी बिछाना

Advertisement

इटलीच्या पर्वतात 2600 वर्षे जुन्या एक थडग्याचा शोध लागला आहे. या थडग्यामधून मिळालेल्या सामग्रीने वैज्ञानिकांना थक्क केले आहे. या थडग्याचे कनेक्शन थेट स्वरुपात एट्रस्केन संस्कृतीशी आहे. याचमुळे वैज्ञानिक याला एक चमत्कार मानत आहेत. पुरातत्वतज्ञांनी इटलीच्या सॅन गिउलिआनोनजीक एक 2600 वर्षे जुन्या एट्रस्केन मकबऱ्याला खुले केले आणि ते अद्यापही पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांना आढळून आले. शतकांपासून होत आलेली लूटपाट आणि आसपासची अनेक थडगी रिकामी असूनही हे थडगे सुरक्षित वाचले होते.  या थडग्यामध्ये नक्षीदार दगडी बिछान्यावर चार सांगाडे झोपलेल्या अवस्थेत मिळाले आहेत. या सांगाड्याच्या चहुबाजूला मातीची भांडी, शस्त्रs,  कांस्याचे दागिने, नाजुक चांदीचे केस यासारख्या 100 हून अधिक सामग्री मिळाल्य आहेत. हे ठिकाण राजधानी रोमपासून सुमारे 70 किलोमटर अंतरावर सॅन गिउलिआनोच्या प्राचीन दफनभूमीत आहे.

2600 वर्षे जुन्या रहस्याची उकल

Advertisement

या उत्खननाला डायरेक्ट बेलर विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डेविड जोरी यांनी केले असून ते सॅन गिउलिआनो पुरातत्व संशोधन प्रकल्प आणि इटालियन वारसा सहकाऱ्यांसोबत मिळून काम करत होते. यादरम्यान प्रत्येक आवरण आणि प्रत्येक वस्तू हटविण्यापूर्वी बारकाईने डॉक्यूमेंट करण्यात आले, जेणेकरून संदर्भत सुरक्षित राहू शकेल. कुठल्या वस्तूचा वापर कुणाकडून आणि कशाप्रकारे झाला हे या संदर्भात स्पष्ट होते. प्रारंभिक कॅटलॉगिंगमध्ये 70 हून अधिक सिरॅमिक भांडी मिळाली, तर एक कांस्य फिबुला (कपड्यांचा क्लिप)वर प्राचीन वस्त्रांच्या खुणा अद्यापही चिकटलेल्या मिळाल्या, ही एक दुर्लभ गोष्ट आहे. यामुळे कपडा तंत्रज्ञानावर नवी माहिती मिळू शकते.

हे पूर्णपणे सीलबंद थडग्याचा कक्ष एट्रस्sकन पुरातत्वासाठी एका दुर्लभ शोधाचे प्रतिनिधित्व करते. मध्य इटलीच्या अंतर्गत पर्वतीय क्षेत्रात जेथे एसजीएआरपी टीम काम करते, या युगाच्या संरक्षित कक्षीय मकबऱ्याच्या आधुनिक पुरातात्विक तंत्रज्ञानांपूर्वी कधी खोदण्यात आले नव्हते असे जोरी यांनी सांगितले.

इटलीचा एट्रस्कन वारसा

एट्रस्कन संस्कृतीने रोमन साम्राज्यापूर्वी इटलीच्या मध्य हिस्स्यात अनेक शतकांपर्यंत राज्य केले होते. त्यांची कला, धार्मिक मान्यता आणि व्यापाराने नंतर रोमन संस्कृतीला प्रभावित केले. सॅन जूलियानोचा हा नेक्रोपोलिस (शवगृह) ज्वालामुखीय खडकांना कापून तयार करण्यात आला असून यात घरासारखा आकार असलेले मकबरे मिळतात.

Advertisement
Tags :

.