For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फेब्रुवारीत 26 हजार कोटींची म्युच्युअल फंडात गुंतवणूक

06:40 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
फेब्रुवारीत 26 हजार कोटींची म्युच्युअल फंडात गुंतवणूक
Advertisement

गुंतवणुकीत 23 टक्के वाढ : स्मॉल कॅप फंडात मात्र घसरण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

फेब्रुवारी महिन्यात म्युच्युअल फंडामध्ये 23 टक्के गुंतवणूक वाढली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. फेब्रुवारीत इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये 26866 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे तर दुसरीकडे स्मॉल कॅप फंडांमध्ये गुंतवणुकीत घसरण दिसून आली आहे.

Advertisement

लार्ज कॅप फंडांमध्येसुद्धा गुंतवणूक कमी झाली असून फेब्रुवारी महिन्यात 921 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या आधीच्या म्हणजे जानेवारी महिन्यात 1287 कोटी रुपयांची गुंतवणूक लार्ज कॅप फंडांमध्ये झाली होती. याउलट फोकस्ड फंडातून मात्र फेब्रुवारी महिन्यात 532 कोटी रुपये काढण्यात आले होते तर स्मॉल कॅप फंडांमध्ये गुंतवणूक 10 टक्के इतकी घटली आहे. फेब्रुवारी महिन्यात या प्रकारामध्ये 2922 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या आधीच्या म्हणजे जानेवारी महिन्यात 3256 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

इतर फंडात काय स्थिती

फेब्रुवारी महिन्यात हायब्रीड फंड प्रकारामध्ये 18,105 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. कंझर्व्हेटीव्ह हायब्रीड फंडांव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या हायब्रीड प्रकारातील फंडांमध्ये गुंतवणूक दिसून आली आहे. फेब्रुवारीत अर्बिटाज फंडांमध्ये 11,508 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

कोणत्या फंडात किती गुंतवणूक

प्रकार                     गुंतवणूक

इक्विटी म्युच्युअल फंड     26866

अर्बिटाज फंड       11,508

हायब्रीड फंड          18,105

स्मॉल कॅप फंड     2922

Advertisement
Tags :

.