Solapur : सोलापुरात कोठे प्रतिष्ठान तर्फे 26 जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात
लिंगराज वल्याळ मैदानात मंगलवाद्यांच्या सूरात विवाह सोहळा
सोलापूर : गोरज मुहूर्तावरची लगबग....मंगलवाद्यांचे सूर...आणि अनुपम्य असा सोहळा 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी जमलेले हजारो वऱ्हाडी अशा वातावरणात बुधवारी स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात झाला.
लिंगराज वल्याळ मैदानावर झालेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, संयोजक आमदार देवेंद्र कोठे, मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी श्री राम मंदिराच्या संकल्पाच्या पूर्णहुतीचा आनंद म्हणून स्व विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान तर्फे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते नव विवाहित जोडप्यांना तीर्थक्षेत्र श्री अयोध्येतील श्री राम मंदिरावरील भगव्या ध्वजाप्रमाणेच कोविदार वृक्ष ओम ची प्रतिमा असलेला भगवा ध्वज घरावर लावण्याकरिता भेट देण्यात आला. तसेच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना देखील आमदार देवेंद्र कोठे यांनी हा ध्वज भेट स्वरूपात दिला.