For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अडीच हजार नोकरभरती, खाजन मंडळ स्थापणार

01:07 PM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
अडीच हजार नोकरभरती  खाजन मंडळ स्थापणार
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची स्वातंत्र्यदिनी घोषणा : पणजीत 78 वा स्वातंत्र्यदिन शानदाररित्या साजरा

Advertisement

पणजी : राज्य कर्मचारी भरती आयोगामार्फत येत्या वर्षभरात विविध सरकारी खात्यांमध्ये सुमारे अडीच हजार नोकऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. अनेक खात्यातील रिक्त पदांवर ही नेमणूक होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात केली. पणजी येथील जुन्या सचिवालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, हळदोण्याचे आमदार अॅड. कार्लोस फेरेरा उपस्थित होते.

About two and a half thousand jobs will be recruited in various government departments in the coming year through the State Staffशंभरटक्के साक्षरतेचे ध्येय

Advertisement

मुख्यमंत्री सावंत यांनी पुढे सांगितले की, 19 डिसेंबर 2024 पर्यंत गोव्यातील साक्षरता 100 टक्के करण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे. शिक्षणक्षेत्रात एसटीईएम, एआय आणि रोबोटिक्समध्ये प्रगती करण्यावर सरकारने भर दिलेला आहे. माध्यमिक शाळा ते उच्च माध्यमिक शाळांपर्यंतच्या अभ्यासक्रमात कोडिंग आणि रोबोटिक्सचा समावेश होणारे देशातील पहिले राज्य म्हणून गोवा राज्य आघाडीवर आहे.

विकसित गोव्यासाठी योगदान हवे 

देशातील इतर राज्यांच्या मानाने गोव्याचा विकास झपाट्याने सुरू आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यामुळे विकसित भारत व विकसित गोवा यासाठी गोमंतकीय जनतेने पूर्ण योगदान व सहकार्य द्यायला हवे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कृषी क्षेत्रात भरीव विकास सुरु

राज्याचा कृषी क्षेत्रातही भरीव विकास सुरू आहे. सरकारमार्फत नवनवीन योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंतही पोहचवल्या जात आहेत. येत्या काळात फोंडा व वाळपई येथील कृषी कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. राज्यातील प्रशासकीय इमारतींची कमतरता असलेल्या 9 तालुक्यांत नवीन इमारती उभारण्यासाठीही सरकार आग्रही असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लवकरच पशुवैद्यकीय महाविद्यालय

राज्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सरकारने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राज्यात आता पशुवैद्यकीय महाविद्यालयही सुरू होणार आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण केल्यानंतर मानवंदना स्वीकारली. त्यानंतर दिवंगत स्वातंत्र्यसेनानी यांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते वाळपई येथील साहिल भिसो लाड यांना ‘जीवन रक्षा पदर पुरस्कार 2024’, पोलीस अधिकारी अऊण डी. बाक्रे आणि एएसआय महेश जी. सावळ यांना सार्वजनिक प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरीसाठी केंद्रीय गृहमंत्रीपदक प्रदान करण्यात आले.

राज्यात लवकरच खाजन विकास व संवर्धन मंडळ

राज्यात खाजन जमीन मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्यांची परिस्थिती सध्या बिकट झालेली आहे. या खाजन जमिनींच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी ‘खाजन विकास आणि संवर्धन मंडळा’ची स्थापना सरकारमार्फत करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री सावंत यांनी केली.

गोवा जमीन संहितेत करणार दुरुस्ती करणार

शेतजमिनीचे संरक्षण करण्यासाठी ‘गोवा जमीन महसूल संहिते’मध्ये बदल करून जमिनींच्या विक्रीवर निर्बंध घातले जातील. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांमधी अल्पोपहार (कॅन्टीन) सेवा सुरू करण्यात येणार असून, यामध्ये स्वयंसहाय्य गटाच्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मनोदय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.