महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

छत्तीसगडमध्ये 25 नक्षलींचे आत्मसमर्पण

06:54 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुनर्वसन धोरणांतर्गत पोलिसांसमोर शरण : संबंधितांवर 37 लाखांचे होते बक्षीस

Advertisement

वृत्तसंस्था/ विजापूर

Advertisement

छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात भैरमगड एरिया कमिटी आणि गांगलूर एरिया कमिटीच्या 25 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या सर्व नक्षलींवर 37 लाखांचे बक्षीस होते. आत्मसमर्पण केल्यानंतर सरकारचे आत्मसमर्पण-पुनर्वसन धोरण आणि विजापूर पोलिसांच्या ‘नियाद नेला नार’ योजनेमुळे प्रभावित होऊन हे पाऊल उचलल्याचे नक्षलवाद्यांनी सांगितले. 2024 मध्ये आतापर्यंत 170 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. दुसरीकडे, गेल्या सात महिन्यात पोलिसांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या 346 नक्षलवाद्यांना अटक केली आहे.

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये पीएलजीए पक्षाचे तीन सदस्य असून त्यांच्यावर प्रत्येकी 8 लाख ऊपयांचे बक्षीस होते. तर डेप्युटी कमांडरवर 3 लाखांचे बक्षीस होते. अन्य नक्षलवाद्यांवरही सुरक्षा यंत्रणांकडून बक्षीस जारी केलेले असून एकंदर सर्वांवर 37 लाखांचे बक्षीस असल्याचे सांगण्यात आले. ज्येष्ठ नक्षलवाद्यांच्या छळ आणि मानसिक-शारीरिक छळाला कंटाळून या नक्षलवाद्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांना सामान्य जीवन जगायचे आहे. या नक्षलींना सरकार आणि पोलिसांच्या योजनांद्वारे आपले जीवन बदलायचे आहे. सीआरपीएफ आणि विजापूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणणार

राज्य सरकार आणि केंद्रीय गृह मंत्रालय छत्तीसगडमधील नक्षलवादाबाबत शून्य सहिष्णुतेच्या धोरणावर काम करत आहे. नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण धोरण सुधारावे लागेल आणि सुविधा वाढवाव्या लागतील. त्यांना अधिक सुविधा देऊन त्यांचे जीवन सुकर करावे लागेल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा संकल्प मोठा आहे. कलम 370 हटवणे असो किंवा दहशतवादी व नक्षलवाद्यांच्या विरोधातील कारवाई असो, वेळेची मर्यादा निश्चित होईपर्यंत आम्ही बस्तरमधील नक्षलवादावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू. विकास पूर्णपणे नक्षलग्रस्त भागात पोहोचेल, असेही त्यांनी पुढे सांगितले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article