25 हायप्रोफाईल जुगाऱ्यांना मध्यप्रदेशात अटक
फार्म हाऊसवर छापा टाकत पोलिसांची कारवाई
जबलपूर :
मध्यप्रदेशमधील जबलपूरमध्ये एका फार्म हाऊसवर टाकलेल्या धाडीत 25 हायप्रोफाईल जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. छाप्यात 5 लाख 72 हजार ऊपये, मोबाईल फोन आणि आलिशान कारही जप्त करण्यात आल्या आहेत. जबलपूरचे पोलीस अधीक्षक संपत उपाध्याय यांच्या आदेशावरून झालेल्या या कारवाईने मध्यप्रदेशातील राजकारणही चांगलेच तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांना याप्रश्नी धारेवर धरले होते. विरोधकांनी सरकारविरोधात आघाडी उघडल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच पोलिसांनी बारगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नर्मदा नदीच्या काठावर मोठी कारवाई केली. खिरहणी गावातील फार्म हाऊसवर छापा टाकून पोलिसांनी 25 हायप्रोफाईल जुगाऱ्यांना अटक केली.
मदन महल येथे राहणारा मुकेश खत्री हा फार्म हाऊसमध्ये जुगार खेळत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मुकेश खत्री, सौरभ ताम्राकर, अभयसिंग ठाकूर, मनीष जीवनी, रॉबिन जैन, रोशन बेन, पियुष सिंग, अवल सोनकर, विपिन डांगे, अखिल सोनकर, जगदीश, अजय सिंग, अमित, तनुज गुप्ता, नितीन चौरसिया, सूरज सोनकर, कुलदीप यांना अटक केली. तसेच सोनकर, प्रिन्स जैन, गोविंद सिंह ठाकूर, धर्मेंद्र गुप्ता आदींवरही कारवाई करण्यात आली.