महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

25 चौकार, 22 षटकार अन् 297 धावा

06:58 AM Oct 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टीम इंडियाकडून टी-20 मालिकेतही बांगलादेशला क्लीन स्वीप : तिसऱ्या सामन्यात 133 धावांनी विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने भारताने दसऱ्याच्या दिवशी विजयाचे तोरण बांधले. शनिवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशवर 133 धावांनी दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने टी-20 मालिकेत बांगलादेशवर 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. संजू सॅमसनचे तुफानी शतक आणि त्याला सूर्याच्या मिळालेल्या झंझावाती साथीच्या जोरावर भारताने भारताने 297 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 7 बाद 164 धावापर्यंत मजल मारता आली. विशेष म्हणजे, कसोटीपाठोपाठ टी-20 मालिकेतही भारतीय संघाने बांगलादेशला व्हाईटवॉश दिला. अवघ्या 47 चेंडूत 111 धावांची खेळी साकारणाऱ्या संजू सॅमसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

प्रारंभी, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाला पहिला धक्का तिसऱ्याच षटकात अभिषेक शर्माच्या रुपाने बसला. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तनझीम हसनने अभिषेक शर्माला अवघ्या 4 धावांवर बाद केले. यानंतर संजू सॅमसन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी बांगलादेशी गोलंदाजांची बेदम धुलाई करत   विक्रमांची मालिका रचली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 70 चेंडूत 173 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी करत असताना या दोघांनी पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदवला.

संजूचे पहिले शतक अन् विक्रमांची बरसात

दरम्यान, संजूने टी-20 कारकिर्दीतील पहिले शतक अवघ्या 40 चेंडूत  झळकावले. 47 चेंडूत 111 धावा करून तो बाद झाला, या खेळीत 11 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. या शतकी खेळीसह त्याने अनेक विक्रमही नोंदवली. संजूचे 40 चेंडूतील शतक हे भारतासाठी दुसरे सर्वात कमी शतक ठरले. याआधी 2017 मध्ये रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावले होते. या दरम्यान, संजूने सामन्यातील 10 व्या षटकांत रिशाद हुसेनच्या गोलंदाजीवर पाच षटकार ठोकले. पहिल्या चेंडूवर त्याला धाव काढता आली नाही पण पुढील पाचही चेंडूवर त्याने षटकार ठोकण्याची किमया केली.

सूर्यकुमार यादवने त्याला चांगली साथ देताना 35 चेंडूत 8 चौकार व 5 षटकारासह 75 धावांची शानदार खेळी साकारली. ही जोडी लागोपाठ बाद झाल्यानंतर रियान परागने 13 चेंडूत 34 तर हार्दिक पंड्याने 18 चेंडूत 47 धावा फटकावल्या. या जोरावर भारतीय संघाने 20 षटकांत 6 गडी गमावत 297 धावांचा डोंगर उभा केला.

रवि बिश्नोईची कमाल, बांगलादेशची निराशा

विशाल 298 धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बांगलादेशचा संघ मैदानात उतरला तेव्हा मयंक यादवने डावाच्या पहिल्याच चेंडूवर परवेझ हुसैन इमॉनला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 59 धावसंख्येपर्यंत पाहुण्या संघाचे टॉप-3 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. अशा स्थितीत लिटन दास आणि तौहीद हृदय यांच्यात 53 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. लिटनने 25 चेंडूत 42 धावा केल्या, तर तौहीद 63 धावा करून नाबाद परतला. आपल्या टी-20 कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी आलेला महमुदुल्लाही केवळ 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर इतर फलंदाजांनीही निराशा केल्याने बांगलादेशला 7 बाद 164 धावापर्यंत मजल मारता आली. त्यांना या सामन्यात 133 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाकडून फिरकीपटू रवि बिश्नोईने शानदार गोलंदाजी करताना 30 धावांत 3 बळी घेतले तर मयांक यादवने दोघांना तंबूचा रस्ता दाखवला.

संक्षिप्त धावफलक

भारत 20 षटकांत 6 बाद 297 (संजू सॅमसन 111, सूर्यकुमार यादव 75, रियान पराग 34, हार्दिक पंड्या 47, तंझिम 3 बळी, महमुदुल्लास, तस्कीन व मुस्तफिजूर प्रत्येकी एक बळी).

बांगलादेश 20 षटकांत 7 बाद 164 (नजमूल शांतो 14, लिटन दास 42, तौहीद नाबाद 63, रवि बिश्नोई 3 बळी, मयांक यादव 2 बळी, सुंदर व नितीश रेड्डी प्रत्येकी 1 बळी).

हैदराबादमध्ये धावांचा पाऊस, चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह 297 धावा

शनिवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध 6 बाद 297 धावा केल्या. भारताची ही टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. भारताने आपल्या डावात 22 षटकार आणि 25 चौकार लगावले. चौकार व षटकारांच्या आतषबाजीतून तब्बल 232 धावा केल्या. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधील ही दुसऱ्या क्रमाकांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. नेपाळने 2023 मध्ये मंगोलियाविरुद्ध 20 षटकात 314 धावा केल्या होत्या. नेपाळच्या नावावर टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

आंतरराष्ट्रीय टी 20 मधील सर्वोच्च धावसंख्या

314 धावा - नेपाळ (वि मंगोलिया)

297 धावा - भारत (वि. बांगलादेश)

278 धावा - झेक प्रजासत्ताक (वि. तुर्की)

हैदराबादमध्ये विक्रमांचे मनोरे

  1. सर्वात वेगवान 100, 150 व 200 धावा

भारताने केवळ 7.1 षटकांत 100 धावांचा टप्पा गाठला आणि पुढील अर्धशतक गाठण्यासाठी केवळ 2.4 षटके लागली. संघाने 14 षटकांत 200 धावांचा टप्पा ओलांडला. याआधी कोणत्याही संघाने अशी कामगिरी केली नव्हती.

  1. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 200 पेक्षा अधिक धावा

बांगलादेशविरुद्ध 297 धावांचा डोंगर उभा करताना भारतीय संघाने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडिया सर्वाधिक वेळा 200 हून अधिक धावा करणारा संघ बनला आहे. संघाने 37 वेळा टी-20 क्रिकेटमध्ये 200 हून अधिक धावा केल्या आहेत. इंग्लंडमधील सॉमरसेट संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांनी 36 वेळा, चेन्नई सुपर किंग्ज संघ 35 वेळा आणि आरसीबीने 33 वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

  1. टी-20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा भारतीय

सॅमसनने केवळ 40 चेंडूत शतक झळकावले, जे टी-20 मधील भारताची दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात रोहित शर्माने अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article