महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रेवनाळमध्ये लांडग्याच्या हल्ल्यात २४ मेंढया दगावल्या! अडीच लाखांचे नुकसान

06:38 PM Sep 30, 2024 IST | Abhijeet Khandekar
sheep died in a wolf attack in Ravnal
Advertisement

जत, प्रतिनिधी

जत तालुक्यातील रेवनाळ येथे लांडग्याच्या हल्ल्यात २० मोठया मेंढ्या तर चार लहान कोकरे दगावल्याची घटना घडली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, रेवनाळ येथील सोपान लोखंडे हे शेती बरोबरच जोडीला मेंढपाळचा व्यवसाय करतात. सोपान लोंखडे हे घरामध्ये झोपलेले असताना सोमवारी पहाटे चारच्या सुमारास लांडग्याच्या कळपाने सोपान लोखंडे यांच्या घराच्या शेजारी उभारण्यात आलेल्या मेंढयाच्या वाकरीत हल्ला चढविला. या हल्ल्यात २० मोठया मेंढया व चार लहान कोकरे यांचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement

मेंढ्याच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याने लोंखडे परिवार जागे झाले. त्यानंतर लांडग्याच्या कळपाने तेथून धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच वन व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत पाहणी करून पंचनामा केला. या घटनेत लोंखडे परिवाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या परिवाराला तात्काळ मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Advertisement

Advertisement
Next Article