For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रिटनमध्ये 24 प्रार्थनास्थळांची होणार चौकशी

07:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
ब्रिटनमध्ये 24 प्रार्थनास्थळांची होणार चौकशी
Advertisement

द्वेष पसरविल्याचा आरोप : पाकिस्तानी वंशीयांकडून संचालन

Advertisement

वृत्तसंस्था/लंडन

ब्रिटनमध्ये द्वेषयुक्त वक्तव्यांप्रकरणी मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी तेथील 24 प्रार्थनास्थळांची चौकशी केली जात आहे. या प्रार्थनास्थळांचे संचालन पाकिस्तानी वंशाच्या लोकांकडून केले जाते. ही प्रार्थनास्थळं ब्रिटनच्या लंडन, बर्मिंघम, लिव्हरपूल आणि मँचेस्टर यासारख्या शहरांमध्ये आहेत. या प्रार्थनास्थळांमधून बिगरमुस्लिमांच्या विरोधात द्वेषयुक्त फतवे जारी करण्यात आले होते. या प्रार्थनास्थळांमधून हमास या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्याचाही आरोप आहे. आरोपी याप्रकरणी दोषी आढळल्यास त्यांना 14 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. गाझामध्ये युद्ध सुरू झाल्यापासून या प्रार्थनास्थळांमधून द्वेष पसरविण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. इस्रायल आणि ज्यू धर्मीयांच्या विरोधात गरळ ओकण्याचा आरोप तेथील मौलवी आणि धर्म प्रचारकांवर आहे. जुलै महिन्यात लेबर पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यापासून याप्रकरणी कठोर पावले उचलण्यात आली आहेत.

Advertisement

ब्रिटन सरकारने 24 हून अधिक मशिदींमधील कारवाया आणि वित्तपुरवठ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. बर्मिंघमच्या मोहम्मदी मशिदचे मौलवी अबू इब्राहिम हुसैन यांच्यावर ज्यूंना ठार करण्याचे आवाहन केल्याचा आरोप आहे. मोहम्मदी ट्रस्टला मागील दोन वर्षांमध्ये ब्रिटनच्या सरकारकडून मोठे अनुदान मिळाले होते.  तर पूर्व लंडनमधील तौहीद प्रार्थनास्थळातील मौलवी शेख सुहैब हसनने इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याला योग्य ठरविले होते. लिव्हरपूल येथील एका मौलवीवरही इस्रायलबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याचा आरोप आहे. अनेक ज्यू कार्यकर्त्यांनी ब्रिटनच्या प्रार्थनास्थळांमध्ये देण्यात आलेल्या द्वेषयुक्त उपदेशांचा एक डोजियर तयार करत तो पोलिसांना सोपविला आहे. या प्रार्थनास्थळांचे संचालन हे पाकिस्तानी वंशाच्या लोकांकडून केले जाते. या प्रार्थनास्थळांमधून ‘इस्रायलला नष्ट करणे, ‘ज्यूंना ठार करणे’, ‘देवासाठी युद्ध छेडणे3़ असे संदेश देण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.