कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगावच्या स्केटर्सना 24 पदके

10:45 AM Oct 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएनशचे निवड झालेले स्केटर्स 41 व्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये राज्यातील 200 स्केटींगपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा तुमकुर व बेंगळूरयेथे झाल्या. या स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्संनी चमकदार कामगिरी करत 13 सुवर्ण, 8 रौप्य व 3  कांस्य अशी एकूण 24 पदके मिळविली.

Advertisement

पदक विजेते स्केटर्स खालील प्रमाणे 

Advertisement

देवेन बामणे 1 सुवर्ण, साईराज मेंडके 2 सुवर्ण, हिरेन राज 1 सुवर्ण, 1 रौप्य, दृष्टी अंकले 1 सुवर्ण, 1 रौप्य, अवनीश कोरिशेट्टी 1 सुवर्ण, 1 रौप्य, मनन अंबीगा 1 सुवर्ण, जयध्यान राज 2 रौप्य, रश्मीता अंबीगा 2 रौप्य, अभिषेक नावले 1 रौप्य, खुशी आगशिमनी 2 रौप्य, अथर्व हडपद 1 कांस्य, अन्वी सोनार 1 सुवर्ण, शेफाली शंकरगौडा 1 सुवर्ण, खुशी घोटीवरेकर 1 सुवर्ण, सई शिंदे 1 सुवर्ण, मुद्दलसिका मुलाणी 1 सुवर्ण, आहद मुलानी 1 सुवर्ण. वरील सर्व स्केटर्संना प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोलकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन तर डॉ. प्रभाकर कोरे, शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, इंदुधर सीताराम यांचे प्रोत्साहन मिळत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article