For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नागपूर विमानतळावर 24 किलो सोने जप्त

12:57 PM Sep 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
नागपूर विमानतळावर 24 किलो सोने जप्त
Advertisement

नागपूर कस्टम्सच्या एअर कस्टम्स यूनिट आणि एअर इंटेलिजन्स यूनिटच्या टीमने मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित प्रवाशाची विमानतळावर तपासणी केली असता 2 ट्रॉली बॅगमध्ये सोने चांदीच्या रंगाच्या जाड तारांच्या स्वरूपात लपवून ठेवलेले आढळून आले. वायरच्या स्वरूपात असलेल्या सोन्याला चांदीचा लेप दिला होता. यामुळे नियमित बॅगेज क्रीनिंग मशीनवर सहज शोधता येत नाही.

Advertisement

या ऑपरेशनमध्ये, 384.100 ग्रॅम आणि 475.230 ग्रॅम 24 किलो सोने पकडण्यात आले. या सोन्याची एकूण किंमत 61,25,549 रूपये इतकी आहे. कतार एअरवेजने (फ्लाइट क्र. क्यूआर‚590) दोहाहून नागपूरला जात असलेल्या दोन प्रवाशांकडून सोने जप्त केले आहे.
यापूर्वी शुक्रवारी 6 ऑक्टोबर 2023 रोजी महिला प्रवाशाने खास तयार केलेल्या बेल्टमध्ये लवपून आणलेले 72 लाखांचे सोने कस्टमने पकडले होते. 29 सप्टेंबर 2023 रोजी कस्टमच्या अधिक़ार्यांनी आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेस्ट स्वरूपात सोने लपवून आणण़ार्या दोघांना अटक केली होती.

भारतीय पासपोर्ट धारक ही महिला प्रवासी शारजाहून नागपूरला एअर अरेबिया फ्लाइट क्र. जी‚9, 415 ने प्रवास करीत होती. तिने घातलेल्या बेल्टमध्ये पेस्टच्या स्वरूपात सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडून 72 लाख 29 हजाराचे 1.270 किलोग्रॅम 24 कॅरेट बारीक सोन्याचे बेल्ट जप्त करण्यात आले.

Advertisement

Advertisement

.