कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Pandharpur : श्री विठ्ठल रुक्मिणीचे आता होणार 24 तास दर्शन !

12:36 PM Oct 27, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

           यात्रा कालावधीत पूजा  व्हीआयपी दर्शन बंद

Advertisement

पंढरपूर : दरवर्षी कार्तिकी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील.

Advertisement

भाविकांना लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. दैनंदिन २४ तास मुखदर्शन व २२.१५ तास पदस्पर्शदर्शन उपलब्ध होत आहे. याशिवाय, मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून व जागोजागी एलईडी टीव्हीद्वारे लाईव्ह दर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#KartikiYatra#pandharpur#PandharpurUpdates#tarun_bharat_news#tarunbharat_official#VitthalDarshan#VitthalTemple
Next Article