डेक्कन ओडिसीतून आलेल्या 23 पर्यटकांकडून कोल्हापूर दर्शन
कोल्हापूर :
पॅलेस ऑन व्हील या राजस्थानातील शाही रेल्वेच्या धर्तीवर महाराष्ट्रात धावण्राया डेक्कन ओडिसी या शाही रेल्वेतून कोल्हापूरात आलेल्या देश-विदेशातील 23 पर्यटकांनी संस्कृतिचा अनुभव घेतला. गेल्या महिन्यापासून डेक्कन ओडिसीच्या ‘महाराष्ट्र दर्शन ‘ उपक्रमास पुर्ववत प्रारंभ झाला आहे. या अंतर्गत पहिल्या फेरीत 18 तर दुस्रया फेरीत 19 आणि बुधवारी तिसरी फेरीत 23 पर्यटक कोल्हापूरात आले होते.
छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर त्यांचे स्वागत रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले. कोल्हापूरी फेटा बांधून कोल्हापूरात आलेल्या पर्यटकांचा गौरव करण्यात आला. यानंतर ए.सी. ट्रॅव्हल्समधून सर्वांना कोल्हापूर दर्शन घडविण्यात आले. रेल्वे स्टेशनवरून प्रथम सर्वांना न्यू पॅलेस मध्ये नेण्यात आले. तेथे छत्रपती शहाजी वस्तू संग्रहालयातील छत्रपती घराण्याचा वारसा सांगण्राया वस्तूंनी पर्यटकांना आकर्षीत केले. प्राणी संग्रहालय पाहिल्यानंतर त्यांनी पॅलेसचा निरोप घेतला. यानंतर टाऊन हॉल वस्तू संग्रहालयात मांडलेल्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाच्या पाऊल खुणांची माहिती पर्यटकांनी घेतली. यानंतर चप्पल लाईनमध्ये कोल्हापूरचे वैशिष्ट्या असण्राया कोल्हापूरी चप्पलांची खरेदी पर्यटकांनी केली. यानंतर करवीर निवासीनी अंबाबाई मंदिराचे स्थापत्य पाहिले. यानंतर जुना राजवाडा येथील भवानी मंडपात महाराष्ट्राची परंपरा जपण्राया शिवकालीन युध्दकलेची प्रात्यक्षीके झाली.