लोकसभेसाठी 23 जागा लढवणार! संजय राऊतांचा केले जाहीर
महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 23 जागा उद्धव ठाकरे गट लढवणार असल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाने नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. या अगोदर इंडिया आघाडीचा घटकपक्ष असलेला काँग्रेस पक्षाने राज्यातील महाविकास आघाडीअंतर्गत जागावाटपाची चर्चा अद्याप झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले "आम्ही शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी तसेच एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली आहे. आम्ही 23 जागा लढवू कारण आम्ही नेहमीच एवढ्या जागा लढवत आलो आहोत."असा त्यांनी खुलासा केला.
पत्रकारांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला किती जागा मिळणार याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी यावर भाष्य केले नाही.
यावर बोलताना त्यांनी "इंडिया आघाडीचा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. यावर दिल्लीत चर्चा होईल कारण या मुद्दयावर निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात एकही काँग्रेस नेता नाही. आणि जे नेते आहेत त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही," असा त्यांनी खुलासा केला.