For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जळत्या मालवाहू जहाजावरील 23 भारतीयांना वाचविले

06:15 AM Oct 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
जळत्या मालवाहू जहाजावरील 23 भारतीयांना वाचविले
Advertisement

दोघे बेपत्ता : येमेन किनाऱ्याजवळ एलपीजीवाहू जहाजावर स्फोटानंतर आग

Advertisement

वृत्तसंस्था/ साना

येमेन किनाऱ्याजवळ एमव्ही फाल्कन या मालवाहू जहाजाला आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. ‘एमव्ही फाल्कन’ हे कॅमेरून ध्वजांकित जहाज  जिबूतीकडे जात असताना एलपीजीवाहू जहाजावर स्फोट झाला. गॅस टँकरच्या स्फोटानंतर जहाजाला आग लागल्यामुळे हाहाकार उडाला. या जहाजावर तैनात असलेले बहुतेक कर्मचारी भारतीय होते. एमव्ही फाल्कनवरील 23 भारतीय क्रू सदस्यांना वाचवण्यात आले असून त्यांना जिबूती तटरक्षक दलाच्या ताब्यात देण्यात आले आहे. आता हा स्फोट नेमका कसा झाला यासंबंधीची चौकशी सुरू आहे. या आगीमुळे जहाजाच्या सुमारे 20 टक्के भागाचे नुकसान झाले.

Advertisement

येमेनमधील एडनच्या किनाऱ्याजवळ एक मोठा सागरी अपघात झाला. कॅमेरून ध्वजांकित ‘एमव्ही फाल्कन’ हे मालवाहू जहाज ओमानमधील सोहर बंदरातून एलपीजी घेऊन आग्नेय दिशेला जिबूतीकडे जात असताना आगीचा भडका उडाला. स्फोटानंतर कॅप्टनने आपत्कालीन मदतीसाठी केलेल्या विनंतीनंतर ‘युएनएव्हीएफओआर एस्पाइड’ने ताबडतोब शोध आणि बचावकार्य सुरू केले. ही घटना शनिवारी घडली. वृत्तानुसार, एव्ही फाल्कनवरील गॅस टँकरचा स्फोट झाल्यानंतर आग लागली. जहाजावरील 25 भारतीय खलाशांपैकी 23 जणांना वाचवण्यात आले आहे. इतर दोघे अजूनही बेपत्ता आहेत. सुटका केलेल्या खलाशांना जिबूती बंदरात सुरक्षितपणे पोहोचवत तटरक्षक दलाच्या स्वाधीन करण्यात आले. सुटका केलेल्या क्रू मेंबर्सवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.  अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही. सध्या तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.