भारतात 2.39 कोटी आयफोन्सची निर्मिती
चालू वर्षामधील आकडेवारी : मागील वर्षापेक्षा 52 टक्के अधिक : अमेरिकेला निर्यात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जगातील प्रसिद्ध आयफोन निर्मितीमधील कंपनी अॅपल यांना अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत विक्री होणाऱ्या एकूण आयफोनपैकी 78 टक्के आयफोन हे भारतात तयार होतात. मार्केट रिसर्चर कौन्सिल यांच्या माहितीनुसार 2025 मध्ये जानेवारी ते जून या कालावधीत भारतात जवळपास 2 कोटी 39 लाख इतक्या आयफोनची निर्मिती झाली आहे. जी मागील वर्षाच्या तुलनेत 53 टक्के अधिक असल्याची माहिती आहे. दरम्यान संशोधन संस्था सायबरमीडिया संशोधन यांच्या अहवालानुसार भारतामधून आयफोनची निर्यात वाढून 2 कोटी 28 लाख युनिट झाली आहे.
52 टक्के वाढ
तर मागील वर्षात समान कालावधीत जानेवारी ते जून या काळात भारतात आयफोन निर्मितीचा आकडा 1 कोटी 50 लाख होता. म्हणजे वर्षाच्या आधारावर सरासरी 52 टक्क्यांची वाढ राहिली आहे. व्यापाराचा विचार केल्यास 2025 च्या पहिल्या सहामाहीत भारताने जवळपास 1.94 लाख कोटी रुपयांच्या आयफोनची निर्यात केली आहे. मागील वर्षातील हा आकडा 1.26 लाख कोटी रुपये राहिला होता.
चीनला टाकले मागे
2025 च्या एप्रिल महिन्यात भारतातून अमेरिकेला 33 लाख आयफोन्सची निर्यात झाली आहे. तर चीनला पाठविण्यात आलेल्या मोबाईल्सची संख्या ही 9 लाखावर राहिली.
या कारणांमुळे भारताकडे लक्ष
पुरवठा साखळी मजबूत :
अॅपल चीनवर असलेले अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे भूराजकीय तणाव, व्यापार गोंधळ आणि कोविड-19 लॉकडाउनची समस्या यामुळे हा निर्णय कंपनीने घेतला आहे.
गव्हर्न्मेंट इंसेंटिव्ह: भारताच्या मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह आणि प्रोडक्शन लिंक इनिशिएटिव्ह (पीएलआय) स्कीम्स योजना कपन्यांना उत्पादन वाढविण्यास लाभदायक ठरताहेत.
वाढती बाजारपेठ संभाव्यता: भारत जगामध्ये सर्वात वेगवान स्मार्टफोन मार्केटमध्ये एक आहे. स्थानिक उत्पादकांकडून अॅपलला ही मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक मदत मिळते आहे.
कुशल मनुष्यबळ : भारताचा कर्मचारी वर्ग हा अधिक चांगला आहे. पण अद्यापही याबाबतीत चीनच्या मागे आहे. अॅपलला फॉक्सकॉनसारखे पर्याय, उत्पदनाची गरज आहे त्यासाठी कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिले जात आहे. कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण झाली तर प्रगती अधिक शक्य आहे.