महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गोवा भाजपला निवडणूक रोख्यांतून 23.05 कोटी

12:04 PM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : निवडणूक रोखे (इलेक्टोरल बाँड्स) माध्यमातून गोवा राज्यातील विविध कंपन्यांनी राजकीय पक्षांना कोट्यावधी रकमेची देणगी दिल्याची माहिती समोर आली आहे. सर्वाधिक मोठी रक्कम रु. 23.05 कोटी हे भाजपला मिळाले असून त्या रकमेच्या जवळपास राज्यातील इतर कोणतेही राजकीय पक्ष नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षाला रु. 1.65 कोटी मिळाले असून त्या खालोखाल महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला रु. 55 लाख प्राप्त झाले आहेत. तृणमुल काँग्रेसला रु. 49 लाख तर ‘आप’ला रु. 38 लाख मिळाले आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाला रु. 35 लाख तर राष्ट्रवादी काँग्रेसला रु. 19 लाख मिळाल्याचे दिसून आले आहे. फोमेंतो समूह (तिंबलो) कंपनीने भाजपला 13 कोटी दिले तर इतर राजकीय पक्षांना काहीच दिले नाही. जय गणेश इस्पात अॅलाय प्रा. लि. या कंपनीने  4 कोटी भाजपला बहाल केले. व्ही. एम. साळगांवकर प्रा. लि. (दत्तराज साळगांवकर समूह) कंपनीने भाजपला रु. 2.2 कोटी, काँग्रेसला रु. 73 लाख, आपला  18 लाख, मगोपला 35 लाख,  गोवा फॉरवर्डला 15 लाख, राष्ट्रवादीला 9 लाख तर तृणमूल काँग्रेसला 4 लाख ऊपये अशी देणगी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. चौगुले कंपनी प्रा. लि. ने भाजपला रु. 1.7 कोटी व काँग्रेसला रु. 30 लाख दिले. धेंपो समूहाने भाजपला 95 लाख, काँग्रेसला रु. 32 लाख, आपला रु. 20 लाख, मगोला 20 लाख, गोवा फॉरवर्ड रु. 20 लाख, राष्ट्रवादीला रु. 10 लाख तर तृणमूल काँग्रेसला 15 लाख अशी देणगी दिली आहे. व्ही. एम. साळगावकर कंपनीने (शिवानंद साळगावकर समूह) भाजपला रु. 90 लाख, काँग्रेसला रु. 30 लाख तर तृणमुल काँग्रेसला रु. 30 लाख दिले आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article