महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोकअदालतीमध्ये 22834 खटले निकालात

06:37 AM Mar 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

28 जोडप्यांची पुन्हा मने जुळली

Advertisement

बेळगाव/प्रतिनिधी

Advertisement

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 22834 खटले निकालात काढण्यात आले. शनिवारी झालेल्या या राष्ट्रीय लोकअदालतीला संपूर्ण जिह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लोकअदालतीमध्ये 28 पती-पत्नींची मने जुळविण्यात आली आहेत. गेल्या काही लोकअदालतींमध्ये कौटुंबिक न्यायालयात पती-पत्नींमधील गैरसमज दूर करून त्यांना नव्याने संसाराला लावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याला ब्रयापैकी यश आले आहे.

लोकअदालतीचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश एल. विजयालक्ष्मी देवी यांच्या हस्ते करण्यात आले. जिह्यातील सर्वच न्यायालयांमध्ये लोकअदालत भरविण्यात आली होती. लोकअदालतीमध्ये 19737 फौजदारी खटले निकालात काढण्यात आले आहेत. लोकअदालतमध्ये पक्षकारांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग दर्शविला. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेले खटले निकालात काढण्यात आले. त्यामुळे पक्षकारांतूनही समाधान व्यक्त करण्यात आले. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरली मोहन रे•ाr यांनी परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article