महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

30 पैकी 22 आयपीओंचा सकारात्मक परतावा

06:34 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ज्योती सीएनसीचा 187  टक्के परतावा : 8 आयपीओंचे निराशादायक प्रदर्शन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

2024 मध्ये आतापर्यंत जे आयपीओ सादर करण्यात आले आहेत, त्यांची कामगिरी दमदार झालेली दिसून आली आहे. लोकसभा निवडणुकीची धांदल आणि अनिश्चितता या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत पहिल्या पाच महिन्यांमध्ये 30 नवे समभाग शेअरबाजारात लिस्ट झाले आहेत. या 30 नव्या आयपीओंपैकी 22 आयपीओंनी जवळपास 73 टक्क्यापर्यंत दमदार परतावा दिला आहे. यापैकी फक्त 8 आयपीओंनी मात्र गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. हे 8 आयपीओ इशू प्राइसपेक्षा कमकुवत होत बाजारात व्यवहार करत आहेत.

8 आयपीओंचा 40 टक्के परतावा

यावर्षी लाँच करण्यात आलेल्या 30 आयपीओंपैकी 8 आयपीओंनी गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. यामध्ये तब्बल 187 टक्के इतकासुद्धा परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे. याखेरीज अन्य 14 आयपीओंनी सकारात्मक परतावा प्राप्त केला आहे. त्याचबरोबर इशू प्राइसच्या तुलनेमध्ये 20 टक्के काही समभाग हे मजबूत दिसून आले आहेत. या आयपीओमध्ये सर्वाधिक दमदार कामगिरी ही ज्योती सीएनसी ऑटोमेशन यांनी केली असून सर्वात खराब प्रदर्शन कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक यांचे दिसून आले आहे.

ज्योती सीएनसी ऑटोमेशन या 2024 मध्ये पहिला आयपीओ सादर करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 187 टक्के इतका दमदार परतावा दिला आहे. कंपनीच्या समभाग इशू प्राइस 331 रुपयाच्या तुलनेमध्ये सध्याला बाजारात समभाग 951 रुपयांवर व्यवहार करताना दिसतो आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article