For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताकडून 21 हजार कोटीची संरक्षण निर्यात; इस्रायल समवेत 84 देशांना उत्पादनांची विक्री

06:51 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताकडून 21 हजार कोटीची संरक्षण निर्यात  इस्रायल समवेत 84 देशांना उत्पादनांची विक्री
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशाची संरक्षण निर्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच संरक्षण निर्यातीने 21 हजार कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. भारताने 84 देशांना स्वत:ची संरक्षण उत्पादने विकून हे लक्ष्य प्राप्त केले आहे. या दिशेने केवळ एका आर्थिक वर्षात 32.5 टक्क्यांची वाढ झाल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी म्हटले आहे.

भारताने एक मोठा संरक्षण आयातदार देशावरून एक मोठा संरक्षण निर्यातदार देश होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. भारताने पहिल्यांदाच 2023-24 या आर्थिक वर्षात 21,083 कोटी रुपयांची संरक्षण निर्यात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संरक्षण मंत्रालयाने उचललेल्या पावलांमुळे ही कामगिरी करता आल्याचे राजनाथ सिंह यांनी नमूद केले आहे.

Advertisement

50 कंपन्यांचे महत्त्वाचे योगदान

संरक्षण निर्यात वाढविण्यासाठी भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राला प्रेरित करण्यासोबत तांत्रिक स्वरुपात आधुनिक करण्याच्या दिशेने सुविधा वाढविण्यात आली आहे. यामुळे सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांसाठी उत्साहदायक वातावरण निर्माण झाले आहे. भारताच्या संरक्षण निर्यातीच्या या यशाच्या कहाणीत सुमारे 50 भारतीय कंपन्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.  या कंपन्यांनी संशोधनासोबत प्रभावशीलता, गुणवत्तेची विशेष काळजी घेत भारताची संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञानाच्या विश्वसनीय पुरवठादाराच्या स्वरुपात जागतिक व्यासपीठावर स्थापित केले असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

हेलिकॉप्टर, कवच इत्यादींची निर्यात

भारताने संरक्षण निर्यातदार म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यात स्वत:ची पोहोच निर्माण केली आहे. देशाची संरक्षण उत्पादने आता इटली, मालदीव, श्रीलंका, रशिया, युएई, पोलंड, फिलिपाईन्स, सौदी अरेबिया, इजिप्त, इस्रायल, स्पेन, चिली समवेत अनेक अन्य देशांपर्यंत पोहोचत आहेत. भारतीय संरक्षण उत्पादनांची मागणी जागतिक स्तरावर वाढत आहे.

भारतीय उत्पादनांवरून विशेष रुची

सुरक्षेच्या क्षेत्रात भारताच्या क्षमतांना जागतिक स्वीकृती मिळाली आहे. भारताकडून वैयक्तिक सुरक्षा उपकरणे, ऑफशोर पेट्रोल व्हेईकल, एएलएच हेलिकॉप्टर, एसयू एवियॉनिक्स, कोस्टल सर्व्हिलान्स सिस्टीम, लाइट इंजिनियरिंग मॅकेनिकल पार्ट्स, कवच एमओडी तसेच अन्य संरक्षण उपकरणांचा पुरवठा करण्यात येत आहे. या अत्याधुनिक संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञानामुळे आंतरराष्ट्रीय खरेदीदारांची भारतीय उत्पादनांमध्ये विशेष रुची आहे.

Advertisement
Tags :

.