कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महासागरांचा 21 टक्के हिस्सा अंधारात

06:22 AM Jun 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सागरी जीवनाला धोका

Advertisement

जगभरातील महासागर वेगाने अंधकारमय होत चालले आहेत. यामुळे सागरी जीवन आणि पर्यावरणावर गंभीर धोक्याची स्थिती निर्माण होत आहे. इंग्लंडच्या प्लायमाउथ विद्यापीठ आणि प्लायमाउथ सागरी प्रयोगशाळेकडुन करण्यात आलेल्या एका जागतिक अध्ययनात ही चिंताजनक बाब समोर आली आहे. 2003 ते 2022 दरम्यान जगभरातील महासागरांचे जवळपास 21 टक्के क्षेत्र म्हणजेच 7.5  कोटी चौरस किलोमीटरपेक्षा अधिक हिस्सा अंधकारमय झाला आहे.

Advertisement

या संशोधनाचे निष्कर्ष ग्लोबल चेंज बायोलॉजीमध्ये प्रकाशित झाले आहेत. संशोधकांनुसार महासागर अंधकारमय होण्याचा तात्पर्य त्यांच्या प्रकाशीय क्षेत्राच्या खोलीत कमी येत आहे. याच भागात सूर्य आणि चंद्राचा प्रकाश सागरी जीवांसाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करतो आणि तेथे जवळपास 90 टक्के सागरी जीवन अस्तित्वात असते. प्रकाशाची ही कमी सागरी पृष्ठभागापुरती मर्यादित नाही, तर ही कमतरता खोलवर फैलावत आहे, यामुळे जैवविविधतेवर धोका निर्माण झाला आहे. या अध्ययनासाठी वैज्ञानिकांनी नासाच्या ओशन कलर वेबद्वारे प्राप्त उपग्रहीय आकडेवारी आणि अत्याधुनिक संख्यात्मक मॉडेल्सचा वापर केला आहे.

किती अन् कसा बदलला समुद्र

संशोधनातून प्राप्त निष्कर्षानुसार 2003-2022 दरम्यान महासागरांच्या पाचव्या हिस्स्यात प्रकाश पोहोचण्याच्या प्रकारात उल्लेखनीय घट झाली आहे. जवळपास 3.2 कोटी चौरस किलोमीटर (9 टक्के क्षेत्र) म्हणजेच आफ्रिका खंडाइतक्या क्षेत्रात प्रकाशीय खोली 50 मीटरपेक्षा अधिक कमी झाली आहे. 2.6 टक्के क्षेत्रात 100 मीटरपेक्षा अधिक कमी झाली आहे. या क्षेत्रात सागरी जीवन गंभीर स्वरुपात प्रभावित होऊ शकते. काही क्षेत्रांमध्ये प्रकाशीय खोलीत सुधारही दिसून आला. जवळपास 3.7 कोटी चौरस किलोमीटर म्हणजेच 10 टक्के क्षेत्र उजळले झाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article