For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फिल्म बाझारात यंदा 208 चित्रपटांचे प्रदर्शन

12:30 PM Nov 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
फिल्म बाझारात यंदा 208 चित्रपटांचे प्रदर्शन
Advertisement

पणजी : राज्यात येत्या 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) फिल्म बाझारमध्ये यंदा तब्बल 208 चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. फिल्म बाझारची यंदाची 18 वी आवृत्ती असून दि. 20 ते 24 नोव्हेंबर दरम्यान मिरामार येथील मॅरियॉट रिसॉर्टमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. फिल्म बाझारच्या माध्यमातून चित्रपट उद्योगातील निर्माते आणि व्यावसायिकांना परस्परांशी जोडणे, सहकार्य करणे आणि स्वप्रतिभेचे दर्शन घडवण्याची संधी देणे हा उद्देश आहे. त्याचबरोबर आपल्या चित्रपटांचे वितरण आणि त्यांना अर्थसाहाय्य मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या निर्मात्यांसाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणूनही हा बाझार महत्वपूर्ण ठरणार आहे.

Advertisement

या बाझारमध्ये ‘व्हिव्हींग ऊम’ अर्थात अवलोकन सभागृह असेल ज्यात भारत आणि दक्षिण आशियातील उत्तमोत्तम चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येईल. ही व्हिव्हींग ऊम 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान उपलब्ध असेल. व्हिव्हींग ऊम लायब्ररीच्या आवृत्तीमध्ये 208 चित्रपट उपलब्ध असतील. त्यात 145 फीचर फिल्म्स, मध्यम लांबीच्या 23 फिल्म्स आणि 30 लघुपट असतील. त्यात एनएफडीसीची निर्मिती आणि सह-निर्मिती असलेले 12 चित्रपट आणि 10 पुनर्निमित चित्रपटांचा समावेश आहे. हे चित्रपट 30 ते 70 मिनिटांचे असतील. त्यापेक्षा कमी कालावधीचे फिल्म्स लघुपट श्रेणीत असतील.

यासंबंधी अधिक माहिती देताना एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार यांनी, हा उपक्रम म्हणजे केवळ स्वओळख निर्माण करणे एवढ्या पुरताच मर्यादित नसून कथाकथनकारांना स्वत:चा दृष्टीकोन जगासमोर मांडण्याची संधी देण्यासाठी देखील एक व्यासपीठ असल्याचे सांगितले. चित्रपटांच्या परिवर्तनकारी सामर्थ्यावर आमचा विश्वास आहे. तसेच प्रेरणा देणाऱ्या आणि मनोरंजन करणाऱ्या कलाकारांच्या भावी पिढीला पाठबळ देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.