भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाची प्रतिकृती; 206 व्या शौर्य दिनानिमित्त अनोख्य़ा पद्धतीने अभिवादन; आंबेडकरी बांधवांची अलोट गर्दी
सांगली :
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या लढाईला 1 जानेवारी 2023 रोजी 206 वर्षे पूर्ण झाली. सांगली येथील रमामाता उद्यानात उभारण्यात येत असलेल्या भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला आज सांगलीतील असंख्य आंबेडकरी बांधवांनी अभिवादन केले. माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या प्रयत्नातून भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाची 75 फूट उंचीची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तरीही आज आंबेडकरी बांधव विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. त्रिसरण गाथा गाऊन या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्व बांधवांनी मानवदंना देण्यात आली.
महाराष्ट्रात भीमा कोरेगावनंतर सांगलीत महानगरपालिकेच्या वतीने 75 फूट उभारण्यात आलेला इतिहासाची साक्ष असलेला शौर्य विजयस्तंभला अभिवादन करण्यात आले. विजय स्तंभाला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलाची सजावट करण्यात आली. काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील व सुकुमार कांबळे. यांनी भेट देऊन अभिवादन केले. समता सैनिक दलाने यावेळी मानवंदना दिली. यावेळी जगन्नाथ ठोकळे, अरुण आठवले , प्रफुल्ल ठोकळे, वीरेंद्र थोरात, छाया सरवदे, शशिकला घाडगे ,रवींद्र घाडगे, अरुण आठवले उत्तम कांबळे ,विद्याताई कांबळे ,हनुमंत साबळे ,सुनील साबळे ,अमर सम्राट, अतुल आठवले आदी मान्यवर उपस्थित होते.