महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

2000 कोटींच्या ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश

06:51 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तामिळी चित्रपट निर्माता मुख्य सूत्रधार : तिघांना अटक : मलेशिया, न्यूझीलंडपर्यंत व्यवहार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

अमली पदार्थ तस्करीतील कारवाईवेळी ड्रग्जच्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे. एनसीबी, विशेष कृती दल आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत दिल्लीत 50 किलो स्यूडोफेड्रिन जप्त करण्यात आले असून, तामिळनाडूतून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हे नेटवर्क इतके मोठे आहे की त्यांचे धागेदोरे भारतासोबतच न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि मलेशियापर्यंत विस्तारल्याचे स्पष्ट झाले आहे.

अटक केलेल्या संशयित तस्करांची चौकशी केल्यानंतर संबंधितांनी गेल्या 3 वर्षात एकूण 45 खेप पाठवल्या होत्या, ज्यात सुमारे 3,500 किलो स्यूडोफेड्रिन होते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची अंदाजे किंमत 2,000 कोटी ऊपयांपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तस्करीचा मुख्य सूत्रधार तामिळ चित्रपट निर्माता असल्याचे समजले असून तो फरार आहे. स्यूडोफेड्रिनचा स्रोत शोधून काढण्यासाठी त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती एनसीबीने दिली.

खाद्यपदार्थांच्या नावाखाली अमली पदार्थांची तस्करी

हेल्थ मिक्स पावडर, सुके खोबरे या खाद्यपदार्थांच्या नावाखाली हवाई आणि सागरी मालवाहतूक करून अमली पदार्थांची तस्करी केली जात होती. संपूर्ण आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा भंडाफोड करण्यासाठी एनसीबी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. वाळलेल्या नारळाच्या पावडरमध्ये दडवून ठेवलेला स्यूडोफेड्रिनचा मोठा साठा दोन्ही देशांत पाठवला जात असल्याची माहिती न्यूझीलंडचे कस्टम अधिकारी आणि ऑस्ट्रेलियन पोलिसांकडून मिळाली होती. स्कूडोफेड्रिनचा वापर मेथॅम्फेटामाइन तयार करण्यासाठी केला जात असून तो जगभरात सर्वाधिक मागणी असलेला अमली पदार्थ आहे. हे अमली पदार्थ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुमारे 1.5 कोटी ऊपये प्रतिकिलो दराने विकले जातात.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article