महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इस्रायलच्या हल्ल्यात 200 ठार

06:55 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लेबेनॉनवर केला बाँबवर्षाव, अचूक लक्ष्यवेधामुळे हिजबुल्लाची मोठ्या प्रमाणावर हानी

Advertisement

वृत्तसंस्था / मरजायुन

Advertisement

इस्रायलने लेबेनॉवर केलेल्या लक्ष्यकेंद्री हल्ल्ल्यामध्ये 200 हून अधिक लेबेनॉनी ठार झाले आहेत, अशी माहिती लेबेनॉनच्या प्रशासनाने दिली आहे. इस्रायलने हा हल्ला हिजबुल्ला या इस्लामी दहशतवादी संघटनेच्या केंद्रांवर चढविला होता. हल्ल्यापूर्वी इस्रायलने लेबेनॉनच्या नागरिकांना हिजबुल्लाप्रभावित भागांमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. हिजबुल्लाचे दहशतवादी सर्वसामान्य नागरीकांमध्ये लपून स्वत:चे संरक्षण करतात असा आरोप इस्रायलने केला होता.

इस्रायलने सोमवारी केलेला वायुहल्ला गेल्या एक वर्षातील सर्वात मोठा मानला जात आहे. पहिल्याच टप्प्यात जवळपास 200 जण मृत झाल्याचा आकडा जाहीर करण्यात आला असून 700 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात अन्य हानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. या हल्ल्यानंतर दक्षिण लेबेनॉनचा प्रदेश सोडण्यासाठी लेबेनॉनी नागरिकांची झुंबड उडाली आहे. सिडॉन या समुद्रतटावरील शहराच्या प्रवेशद्वारावर पळून जाणाऱ्या नागरिकांची गर्दी झाली होती. या शहराच्या प्रवेशद्वारावर गर्दीमुळे वाहतून कोंडी झाली होती.

300 लक्ष्यांवर बाँबवर्षाव

इस्रायली विमानांची लेबेनॉनमधील हिजबुल्लाच्या शस्त्रागारांवर हा हल्ला केला. 300 हून अधिक केंद्रांना लक्ष्य बनविण्यात आले होते. हिजबुल्लाचा शस्त्रसाठा नष्ट करणे, हे ध्येय इस्रायलने ठेवले आहे. सामान्य नागरीकांना मारण्याचा किंवा त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. सामान्य माणसांचा ढाल म्हणून उपयोग करुन आपल्या दहशतवादी कारवाया करणारे हिजबुल्लाचे दहशतवादी हे लक्ष्य आहे. हिजबुल्लाचा शक्तीपात केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे इस्रायलने स्पष्ट केले.

हिजबुल्लाच्या हल्ल्याविरोधात इशारा

इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हिजबुल्लाकडूनही अग्नीबाणांचा मारा होण्याची शक्यता होती. त्यामुळे इस्रायलने आपल्या उत्तर भागातील नागरीकांसाठी सायरन इशारा दिला होता. त्यामुळे आधीच अनेक इस्रायली नागरीकांची सुरक्षित स्थळी आश्रय घेतला होता. तथापि, असा अग्नीबाणवर्षाव झाला नाही.

हिजबुल्लाचे शस्त्रसाठे नष्ट

इस्रायलने दक्षिण लेबेनॉनमध्ये हिजबुल्लाच्या अग्नीबाणसाठ्यांवर हल्ले केल्याचे प्रतिपादन केले आहे. रविवारी हिजबुल्लाकडून 150 अग्नीबाणांचा वर्षाव इस्रायलवर केला होता. पण त्या इस्रायलची मोठी हानी झाली नव्हती. काही इमारतींना मात्र आग लागली होती. गॅलिलीतील इस्रायलली सैनिक चौकीवर हल्ला करण्यात आला होता. मात्र, मंगळवारच्या इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाची मोठी हानी झाली आहे.

सोमवारीही हल्ले

इस्रायलने हिजबुल्ला दहशतवाद्यांच्या साधारणत: 150 आश्रयस्थानांवर हल्ले केले होते. त्यामुळे दक्षिण लेबेनॉनमधील खेड्यांमध्येही घबराट पसरली होती. शुक्रवारी इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचा एक म्होरक्या ठार झाला होता तसेच त्याचे सात ते आठ सहकारीही प्राणास मुकले होते. या हल्ल्यात काही महिला आणि बालकांनीही प्राण गमावले होते, अशी माहिती देण्यात आली आहे.

मागे सरकविण्याचा प्रयत्न

हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना आपल्या उत्तरसीमेपासून मागे हटविण्याचा इस्रायलचा प्रयत्न आहे. तसे झाल्यास इस्रायलचे नागरीक पुन्हा आपल्या सीमेवरील घरांमध्ये परतू शकतात. त्यामुळे इस्रायलने दक्षिण लेबेनॉनवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढविले असून या धोरणाला यश येत असल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी हिजबुल्लावर पेजर हल्ला झाला होता. तो इस्रायलनेच केला असा आरोप असला तरी अद्याप तसे सिद्ध झालेले नाही. मात्र, त्या हल्ल्यामुळे हिजबुल्लाचे नीतीधैर्य ढासळले आहे, असे दिसून येते. याचाच लाभ घेऊन इस्रायलने आपल्या वायुहल्ल्यांचे प्रमाण गेल्या तीन दिवसांमध्ये वाढविले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article