महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

200 माजी खासदारांना सोडावा लागणार आलिशान बंगला

06:46 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केंद्र सरकारने जारी केली नोटीस :

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

लोकसभा निवडणुकीत अनेक नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे, आता या नेत्यांना त्यांचा शासकीय बंगलाही सोडावा लागणार आहे. केंद्र सरकारने दिल्लीतील लुटियन झोनमधील भव्य बंगल्यांमध्ये राहत असलेल्या 200 हून अधिक माजी खासदारांना तो रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. नव्या लोकसभेत निवडून आलेल्या नव्या खासदारांना अद्याप निवासस्थान प्रदान करण्यात आलेले नाही. निवासस्थानाची मागणी करणाऱ्या खासदारांची संख्या मोठी आहे. जुन्या अन् माजी खासदारांनी बंगला रिकामी केल्यावरच नव्या खासदारांना दिल्लीत निवासस्थान प्राप्त होणार आहे. माजी खासदारांना एक महिन्याच्या आत निवासस्थान रिकामी करण्याचा निर्देश देण्यात आला आहे.

अनेक माजी खासदारांनी कालमर्यादा संपल्यावरही शासकीय बंगल्यांवरील स्वत:चा कब्जा कायम ठेवला आहे. याचमुळे या माजी खासदारांना आता नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसनंतरही बंगला रिकामी न केल्यास माजी खासदारांना तेथून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

लोकसभा हाउस कमिटी खासदारांना निवासस्थानांचे वाटप करते. तर केंद्रीय आवास आणि शहरविकास मंत्रालयाच्या अंतर्गत संपदा निदेशालय मंत्र्यांना बंगले प्रदान करते. अद्यात नव्या मंत्र्यांना देखील कुठलाही बंगला उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचे समजते.

शासकीय निवासस्थान रिकामी करण्याचा नियम

नियमानुसार संसद सदस्यत्व गमावल्याच्या 15 दिवसांच्या आत शासकीय बंगला रिकामी करावा लागतो. सर्वसाधारणपणे नोटीस मिळाल्याच्या 30 दिवसांच्या आत बंगला सोडावा लागतो. विशेष परिस्थितीत बंगला रिकामी करण्यासाठी बळाचा वापर देखील केला जाऊ शकतो.

दिल्लीत कुठे मिळते निवासस्थान

खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना लुटियन्स दिल्लीत बंगला उपलब्ध करून दिला जातो. टाइप 5 ते टाइप 8 पर्यंतचा बंगला खासदार, केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांना उपलब्ध करून दिला जातो. तर पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदारांना टाइप 5 बंगला दिला जातो. टाइप 8 बंगल्यांचे वाटप कॅबिनेट मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, माजी पंतप्रधान, माजी राष्ट्रपती, माजी उपराष्ट्रपती आणि वित्त आयोगाच्या अध्यक्षांना केले जाते. टाइप 8 बंगला सुमारे 3 एकरमध्ये फैलावलेला असतो. यात 5 बेडरुम्स, एक हॉल, एक डायनिंग रुम, स्टडी रुम असते. तर अतिथींना भेटण्यासाठी एक बैठक खोली आणि सर्व्हंट क्वार्टर देखील असते. टाइप 8 बंगले जनपथ, त्यागराज मार्ग, कृष्ण मेनन मार्ग, अकबर रोड, सफदरजंग रोड, मोतीलाल नेहरू मार्ग आणि तुघलक मार्गावर आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article