कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुलीवर लैंगिक अत्त्याचार करणाऱ्यास 20 वर्षांची शिक्षा

11:47 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

न्या. दुर्गा मडकईकर यांचा निवाडा : डिचोलीतील 2019 ची घटना

Advertisement

पणजी : डिचोली येथे अल्पवयीनावर बलात्कारप्रकरणी पणजी येथील पॉक्सो न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून 20 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. आरोपीने 17 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे पुरावे, साक्षीदार मिळाल्याने जलद गती विशेष न्यायाधीश दुर्गा मडकईकर यांनी आरोपीला 20 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. डिचोली येथे 23 जुलै 2019 रोजी आरोपीने 17 वर्षांच्या मुलीला जवळ बोलावून मोबाईलवर आपत्तीजनक व्हिडीओ दाखवून तिच्यावर लैगिक अत्याचार केले होते. त्याने या मुलीचे तिच्या घरातून अपहरण करून तिच्यासोबत आणखी तीनवेळा लैंगिक संबंध केल्याने ती गरोदर राहिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून बाल न्यायालयात खटला सुऊ केला. त्यावेळी आरोपीने आपल्यावरील सर्व आरोप नाकारले होते. डिचोली पोलिसांनी याप्रकरणी मुलीचा वैद्यकीय अहवाल, मुलीचे वयोमान निश्चित करणारा अहवाल, गरोदर असल्याचा दाखला आणि अन्य कागदोपत्री पुरावे सादर केले. आरोपीच्या वकिलाने मुलीचे वय अधिक असल्याचा दावा करून ती सज्ञान असल्याचे नमूद केले. त्यावर पोलिसांनी कर्नाटक राज्यातील मुख्य निबंधकाचे म्हणणे नोंद केले. आरोपीच्या वकिलाने मुलीवर कोणतीही जबरदस्ती करण्यात आल्याचे नाकारून ती आपणहून घर सोडून आल्याचे सांगितले.

Advertisement

सदर आरोपी हा लग्न झालेला असून त्याला दोन मुलेही आहेत. तो बेकार असल्याने घरीच राहत असे. त्यावेळी शेजारीच राहत असलेल्या या अल्पवयीन मुलीशी त्याने मैत्री करून तिचा विश्वास मिळवला. त्याने एकदा तिला 15 दिवसासाठी फिरायला विविध ठिकाणी नेले. त्यावेळी तिला लग्नाचे वचन देऊन तिचा गैरफायदा घेताना अनेकवेळा लैगिक अत्याचार केले असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सिद्ध केले. त्या मुलीने ही गोष्ट मान्य करून आपणाला आरोपी आवडत नसतानाही त्याने संबंध जोडले असल्याचे न्यायालयात नमूद केले. दोन्ही बाजूचे पुरावे आणि म्हणणे जाणून घेतल्यावर न्या. दुर्गा मडकईकर यांनी आरोपीला भारतीय दंड संहितेचे कलम- 363, 376 आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 4,6 आणि 12 खाली त्याला दोषी धरला. आरोपीला कलम- 363 खाली तीन वर्षाची  सश्रम कारावासाची आणि कलम- 376 खाली 20 वर्षे  सश्रम कारावासाची आणि 5 हजार ऊपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. पॉक्सो कायद्याखाली 10 वर्षांची आणि तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा फर्मावली. या सर्व शिक्षा एकत्रित भोगण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article