For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागतिक इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात 20 टक्के भागीदारी राहणार

06:46 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
जागतिक इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात 20 टक्के भागीदारी राहणार
Advertisement

केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची माहिती

Advertisement

नवी दिल्ली :

जागतिक इलेक्ट्रॉनिक्स हिस्सेदारीत भारत हा महत्त्वाचा वाटा उचलण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी काळात या क्षेत्रात 20 टक्के इतका वाटा प्राप्त केला जाणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.

Advertisement

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी एका संभाषणात, इलेक्ट्रॉनिक्स आणि सखोल तंत्रज्ञानासाठी देशाचा दृष्टीकोन, उत्पादकाकडून निर्यातदारापर्यंतचे परिवर्तन आणि धोरणात्मक आव्हानांना सामोरे जाण्याचे मार्ग यासारख्या विविध मुद्यांवर तपशीलवार चर्चा केली.

सदरच्या संभाषणात चर्चेत आलेले प्रश्न

300 अब्ज डॉलर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे लक्ष्य निश्चित केले का?

तुम्ही आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 300 अब्ज डॅलर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. मोबाईल डिव्हाइसेस पीएलआयने निर्यात आणि उत्पादन मूल्य लक्ष्य ओलांडले आहे. अर्थसंकल्पात यासाठी 6 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मग अंतिम ध्येय काय आहे?

मला वाटते की आम्ही आता इलेक्ट्रॉनिक्स ग्लोबल व्हॅल्यू चेनमध्ये आमचे स्थान मजबूत केले आहे. हे महत्त्वाचे आहे कारण 2014 मध्ये आमची तेथे उपस्थिती नव्हती. नोकियाच्या अपयशानंतर आणि चीनमधून होणाऱ्या अखंड आयातीनंतर - आपणही आपला ठसा उमटवू शकू, याची त्यावेळी कोणीही कल्पना केली नसेल. सुमारे 1.5 ट्रिलियन डॉलर किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स जीव्हीसीमध्ये चीनचा वाटा 70 ते 75 टक्के होता.

आम्ही 2024 मध्ये 300 अब्जचा टप्पा प्राप्त केला

आमच्याकडे काहीही नव्हते, परंतु आम्ही 2024 मध्ये 300 अब्ज डॉलरच्या ध्येयाजवळ आहोत. याशिवाय, आर्थिक वर्ष 2026 पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स जीव्हीसीमध्ये 15 ते 20 टक्के वाटा मिळवण्याचे आमचे लक्ष्य आहे. मूल्यवर्धन हा वादग्रस्त मुद्दा आहे. आज अॅपलकडे 12 ते 15 टक्के आणि इतरांकडे सुमारे 20 टक्के हिस्सेदारी आहे.

पुढील दोन वर्षे किती महत्त्वाची असतील?

प्रत्येक वस्तूच्या आधारावर इलेक्ट्रॉनिक्समधील मूल्यवर्धन कधीही ठरवले जाणार नाही. हे सकल मूल्यवर्धनाद्वारे ठरवले जाईल. उदाहरणार्थ, चीन 1.2 ट्रिलियन डॉलर्सच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन आणि निर्यात करतो. पण ते 60 ते 70 कोटी डॉलर्सचे भागच आयात करते. आमची दृष्टी 300 अब्ज डॉलर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनापर्यंत पोहोचणे आणि 60 ते 75 अब्ज डॉलर मूल्य वाढीचे लक्ष्य गाठणे असल्याचेही मंत्री चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले आहे.

एकूण मूल्यवर्धनासाठी तुम्हाला काय अपेक्षित आहे?

आम्ही सध्या पहिल्या विश्वसनीय फॅब प्रस्तावाचे मूल्यमापन करत आहोत. असाच आणखी एक प्रस्ताव विचाराधीन आहे. चार कंपाऊंड सेमीकंडक्टर फॅब प्रस्ताव आणि तीन पॅकेजिंग प्रस्तावांचे मूल्यांकन केले जात आहे. मायक्रॉन प्लांटला मंजुरी दिल्यानंतर त्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

Advertisement
Tags :

.