For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युपीएससीत कर्नाटकातून 20 जणांची निवड

12:08 PM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
युपीएससीत कर्नाटकातून 20 जणांची निवड
Advertisement

बेंगळूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) 2024 सालातील नागरी सेवा परीक्षेचा (सीएसई) अंतिम निकाल मंगळवारी जाहीर केला. विविध पदांच्या नेमणुकीसाठी शिफारस झालेल्या 1,009 उमेदवारांमध्ये कर्नाटकातील 20 जणांचा समावेश असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हावेरी जिल्ह्याच्या राणेबेन्नूर तालुक्यातील कोडियाल होसपेट गावचे रहिवासी डॉ. सचिन गत्तूर यांनी युपीएससीत 41 वा रँक प्राप्त केला आहे. सचिन गत्तूर हे ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा बजावतात. त्याचप्रमाणे बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील अक्कीमरडी गावातील पांडुरंग सदाशिव कंबळी यांनी 529 वा रँक मिळविला आहे. कर्नाटकातून आर. रंगमंजू यांनी 24 वा रँक प्राप्त केला आहे. सचिन गत्तूर यांनी 41, अनुप्रिया सख्य 120, बी. एम. मेघना 425, माधवी आर. 446, भरत यारम 567, भानूप्रकाश 523, निखिल एम. आर. 724, टी. विजयकुमार 894, हनुमंतप्पा नंदी 910, विशाखा कदम 962, संदीप सिंग 981, मोहन पाटील 984 यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.