कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

2027 पर्यंत 20 नवे प्रिमीयम मॉल्स होणार सुरु

06:40 AM Apr 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

सिमेंट क्षेत्रात कार्यरत असणारी मोठी कंपनी अंबुजा सिमेंटने मंगळवारी आपला जानेवारी ते मार्च दरम्यानचा तिमाही निकाल जाहीर केला आहे. यामध्ये वर्षाच्या आधारे कंपनीचा नफा हा 9 टक्क्यांनी घटून तो 956.27 कोटी रुपयावर राहिला आहे. जो एक वर्षांपूर्वी समान तिमाहीत 1,050.58 कोटी रुपये होता. अंबुजा सिमेंटने दिलेल्या एक्सचेंज फाईलमधील माहितीनुसार तिमाही आधारावर कंपनीचा नफा हा जवळपास निम्मा झाला आहे. कंपनीचा एकूण खर्च मार्च तिमाहीमध्ये वर्षाच्या आधारे 14 टक्क्यांनी वाढला असून तो वाढीसह 8,821.70 कोटीवर राहिला. एक वर्षापूर्वी समान कालावधीत हा आकडा 7,747.41 कोटींवर होता. तसेच आर्थिक वर्ष 2024-25 साठी 2 रुपये लाभांश जाहीर करण्यास कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.

Advertisement

ओरीयंटचे केले अधिग्रहण

याचदरम्यान सिमेंट क्षेत्रातील अंबुजा सिमेंटने ओरीयंट सिमेंटमधील अधिग्रहण पूर्ण केले आहे. अदानी समूहाच्या मालकीच्या सदरच्या कंपनीने सी के बिर्ला समूहातील फर्म ओरीयंट सिमेंटमधील 37.8 टक्के इतकी हिस्सेदारी अधिग्रहण केली आहे. अंबुजा सिमेंटची एकंदर हिस्सेदारी आता 46.66 टक्क्यांवर पोहचली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article