सोलापूर स्थानकावर १४ लाख रुपये किंमतीची २० किलो चांदी पकडली
सिकंदराबाद-राजकोट एक्स्प्रेसमधील घटना; चांदीचे बाजार मूल्य सुमारे १४ लाख रुपये
प्रतिनिधी प्रतिनिधी
सोलापूर : सिकंदराबाद-राजकोट एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या तीन स संशयित व्यक्तीकडून सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी आणि रेल्वे सुरक्षा दलाने तब्बल २० किलो ३०० ग्रॅम चांदी सोलापूर रेल्वे स्थानकावर जप्त केली. या चांदीचे बाजार मूल्य सुमारे १४ लाख रुपयाचा मुद्देमाल असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक २२७१८ सिकंदराबाद-राजकोट एक्सप्रेसच्या बोगी क्रमांक ५ व ६ मधून तीन संशयित सिकंदराबाद येथील सराफाच्या घरामध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेत २० किलो ३०० ग्रॅम वजनाच्या देवी-देवतांच्या मूर्ती चोरून घेऊन जात असल्याचे सोलापूर लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळली. दरम्यान सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अधिकारी, कर्मचारी सोलापूर रेल्वे स्थानकावरील फलट क्रमांक पाचवर गाडी येताच बोगी क्रमांक पाच व सहा येथे तपासणी केली येथे तीन इसम संशयितरित्या व काळ्या रंगाची एक बॅग मिळून आली त्यांची विचारपूस केली असता त्यांनी घरामध्ये पैशाची अडचण असल्याने चोरी केल्याचे सांगितले. यात सुनीलसिंग शेरसिंग रावत (वय. २४, रा. मन्नावास थाना जवाजा ता. ब्यावर जि. अजमेर राज्य राजस्थान) याससह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या चोरीबाबत सिकंदराबाद येथील मार्केट पोलीस ठाणे येथे वरील संशयित व चांदीचे दागिने याबाबत गुन्हा दाखल असून मार्केट पोलीस ठाणे सिकंदराबाद येथील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मय्या हे सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे आले असता त्यांच्या ताब्यात तिघा संशयीतांना व मुद्देमाल त्यांच्या ताब्यात देण्यात आला. ही कामगिरी पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक तुषार दोषी, उपविभागीय पोलीस अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) संगीता हत्ती यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, सहाय्यक पोलीस फौजदार संजय जाधव, पोलीस हवालदार प्रमोद सुरवसे, पोलीस हवालदार प्रमोद जिराळ, पोलीस कॉन्स्टेबल संतोष सवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे लोहमार्ग यांच्याकडील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय वाघमारे, पोलीस हवलदार विजय कांबळे यांनी व आरपीएफ कर्मचारी यांनी कामगिरी केली.