कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोन तासात होणार 20 ई-बस चार्जिंग

11:33 AM Mar 01, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / इम्रान गवंडी : 

Advertisement

शास्त्रीनगर परिसरातील बुद्ध गार्डन समोर असणाऱ्या केएमटी वर्कशॉप च्या बाजूला नवीन ई-बसचे चार्जिंग स्टेशन उभारले जात आहे. चार्जिंग स्टेशनसाठी लागणाऱ्या विजेच्या उच्च दाब विद्युत वाहिनीच्या लाईनचे काम पूर्णत्वास आले आहे. याठिकाणी 22 चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असुन केवळ दोन तासात 20 -बस चार्जिंग होण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Advertisement

साडेपाच एकर जागेत सुरू असणाऱ्या कन्स्ट्रक्शनच्या कामाला गती येण्याची गरज आहे. अद्यापही पूर्ण जागेतील फौंडेशनचे काम सुरू आहे. फौंडेशनसह नवीन अद्ययावत प्रशासकीय इमारत, कँटीन, संरक्षक भिंत, -बस पार्कींग व क्लिनिंग विभाग, रेस्टरूम, स्टोर विभाग आदी कामे शिल्लक आहेत. ही कामे पूर्ण होण्यास दोन ते अडीच महिन्याचा कालावधी लागणार असे सांगितले जात असले तरी कामाला गती येण्याची गरज असुन लवकर काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

पंतप्रधान ई-बस योजनेतून केएमटीला 100 -बस मंजूर झाल्या आहेत. बसच्या चार्जिंग स्टेशनचे काम प्रगती पथावर असुन 22 चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. यासाठी खासगी कंपनीचे तंत्रज्ञ नेमले जाणार आहेत. यातील 20 स्टेशन सुरू राहणार आहेत. व उर्वरित दोन स्टेशन इमर्जन्सी स्पेअरसाठी ठेवण्यात येणार आहेत. केएमटी उभी करण्यासाठी 100 मीटरचे चॅनेल तयार केले जाणार आहे. यातील एक बस 100 टक्के चार्जिंग होण्यासाठी दोन ते अडिच तासांचा कालवधी लागणार आहे. बस चार्जिंगची सुविधा 24 तास उपलब्ध राहणार आहे.

-बस चार्जिंग स्टेशनच्या भुयारी विद्युत वाहिनीला गोकुळ शिरगाव येथील कणेरी फाट्यापासून सूरूवात झाली आहे. जमिनीखालून एकूण 10 किलोमीटरचा प्रवास करत केएमटीच्या यंत्रशाळेपर्यंत आली आहे. यातील 6 ते 7 किलोमीटरचे काम पूर्णही झाले आहे. केवळ 2 ते 3 किलोमीटरचे काम राहीले आहे. तेही काम लवकरच पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे.

कणेरीमठ फाटा - गोकूळ शिरगाव - केंडूसकर पेट्रोल पंप - उजळाईवाडी हायवे पोलीस केंद्र - शाहू जकात नाका - डीओटी सेंटर चौक - शिवाजी विद्यापीठ - कोयास्को चौक - राजाराम कॉलेज - सायबर चौक - एनसीसी भवन - सम्राटनगर - शास्त्रीनगर - केएमटी यंत्रशाळा

शहरासह ग्रामीण भागातील विविध भागातील मार्गावर 65 बसेस धावत आहेत. रोजच्या प्रवाशांची वाढणारी आकडेवारी पाहता सध्याच्या बसेस कमी पडत आहेत. बसची संख्या अपुरी असल्यामुळे काहीवेळा वेळापत्रक कोलमडते. प्रवासीसंख्या जास्त असल्यामुळे बसमध्ये क्षमतेपेक्षा जादा प्रवाशी भरले जात आहेत. त्यामुळे या बसना भार सोसवेना झाला आहे. रोज बसचा मेंटनन्स वाढत आहे. त्याचबरोबर सध्याच्या बहुतांश बसेसचे मुदत संपत आली आहे. त्यामुळे नवीन 100 -बसची प्रतिक्षा आहे.

एकूण बसची संख्या : 76

प्रत्यक्षात धावणाऱ्या बस : 65

एसी बस : 6

नव्याने दाखल होणाऱ्या ई-बस : 100

केंद्र शासनाच्या निधीतून कोल्हापूर परिवहन विभागाला नवीन 100 -बस मंजुर झाल्या आहेत. बसच्या चार्जिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच याचे काम पूर्ण होणार आहे. काम पूर्ण होताच नवीन ई-बस दाखल होणार आहेत. त्यामुळे केएमटीची प्रवासी सेवा अधिक दर्जेदार होणार आहे.

                                                                                           पंडित पोवार, उपायुक्त, महापालिका

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article