20 मिनिटात पकडला सर्वात मोठा मासा
18 वर्षांचा मुलगा ठरला चॅम्पियन
एका 18 वर्षीय युवकाने केवळ 20 मिनिटांमध्ये 42 लाख रुपयांचे इनाम जिंकले आहे. या युवकाने मासे पकडण्याच्या स्पर्धेत भाग घेतला हात. या स्पर्धेत काही मिनिटांमध्येच विजय मिळवून तो एका झटक्यात लखपती झाला आहे.
या ऑस्ट्रेलियन युवकाचे नाव जोनो मूरे आहे. जोनाने व्हिक्टोरियाच्या नागाम्बी शहरा आयोजित गोफिश स्पर्धेत भाग घेतला होता. येथे बक्षीस जिंकण्यासाठी म्युरे कॉड नटावाचा सर्वात मोठय़ा आकाराचा शिकारी मासा पकडावा लागणार होता. या स्पर्धेत शेकडो लोकांनी भाग घेतला होता.
सर्व स्पर्धेक जोमाने गोफिश स्पर्धेत उतरले होते. परंतु अखेरीस जोनोने बाजी मारली आहे. मूरेने केवळ 20 मिनिटांमध्ये सर्वात मोठा (105 सेंटीमीटरचा) म्युरे कॉड पकडून 42 हजार युरोंचे (42 लाख रुपयांहून अधिक) इनाम जिंकले आहे.
या स्पर्धेदरम्यान 883 हून अधिक म्युरे कॉड मासे पकडण्यात आले, परंतु त्यातील कुठल्याच माशाची लांबी जोनोने पकडलेल्या माशापेक्षा अधिक नव्हती. स्पर्धेत म्युरे कॉडला मिळून वेगवेगळय़ा प्रकारचे 2,250 मासे पकडण्यात आले.
लहानपणापासूनच वडिलांसोबत मासे पकडत आलो आहे. मी माझे आणि मित्र प्रत्येक वीकेंडला मासे पकडण्यासाठी जातो. आम्ही मिचेल्टनपासून मर्चिसनपर्यंत सर्व ठिकाणी मासे पकडतो. बक्षीसाच्या रकमेतून मासेमारीसाठी एक चांगली नौका खरेदी करणार, असे जोनोने म्हटले आहे.