For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2 दौरे, 3 मालिका, 11 सामने

06:55 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
2 दौरे  3 मालिका  11 सामने
Advertisement

इंग्लंड, स्कॉटलंड दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा : पॅट कमिन्सला विश्रांती, मिचेल मार्श कर्णधार

Advertisement

वृत्तसंस्था/ सिडनी

आयसीसी टी 20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर द्विपक्षीय मालिकांना सुरुवात झाली आहे. वनडे वर्ल्डकप विजेता संघ ऑस्ट्रेलिया संघ सप्टेंबरमध्ये स्कॉटलंड आणि इंग्लंड असे 2 दौरे करणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांविरुद्ध ऑसी संघ एकूण 11 सामने खेळणार आहे. सेमवारी या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे. आगामी काळातील कसोटी मालिकांसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित कर्णधार पॅट कमिन्सला विश्रांती देण्यात आली असून संघाच्या नेतृत्वाची धुरा मिचेल मार्शकडे सोपवण्यात आली आहे.

Advertisement

ऑस्ट्रेलियाच्या स्कॉटलंड दौऱ्याची सुरुवात ही 4 सप्टेंबरपासून होणार आहे.  ऑसी संघ स्कॉटलंडविरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सर्व सामने हे द ऑरेन्ज, एडनबर्ग येथे आयोजित करण्यात आले आहेत. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल. 11 ते 29 सप्टेंबर दरम्यान इंग्लंडविरुद्ध तीन टी 20 आणि पाच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.

यावर्षाच्या अखेरीस भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार आहे. याशिवाय, आगामी काळातील व्यस्त वेळापत्रक पाहता नियमित कर्णधार पॅट कमिन्सला विश्रांती देण्यात आली आहे. कसोटी सामन्यासाठी तो पूर्णपणे फ्रेश रहावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ऑस्ट्रेलियन निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी सांगितले. कमिन्सच्या अनुपस्थितीत मिचेल मार्श या दोन्ही दौऱ्यातील 3 मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाची कॅप्टन्सी करणार आहे. याशिवाय, कूपर कोनोली आणि जॅक फ्रेजर या युवा खेळाडूंना संधी दिली आहे. दरम्यान, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांची निवड केवळ इंग्लंड विरूद्ध वनडे मालिकेसाठी करण्यात आली असल्याचे बेली यांनी सांगितले. याशिवाय, ट्रेव्हिस हेड, जोस हॅजलवूड, कॅमरुन ग्रीन हे अनुभवी खेळाडू संघात असणार आहेत.

ऑस्ट्रेलियन टी 20 संघ : मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टीम डेविड, नॅथन एलिस, जॅक फ्रेजर-मॅकगर्क, कॅमरुन ग्रीन, अॅरॉन हार्डी, जोस हेजलवूड, ट्रेव्हिस हेड, जोस इंग्लिस, स्पेंसर जॉन्सन, मार्कस स्टोइनिस, अॅडम झाम्पा.

ऑस्ट्रेलियन वनडे संघ - मिचेल मार्श (कर्णधार), सीन अॅबॉट, अॅलेक्स केरी, नॅथन एलिस, जॅक फ्रेजर-मॅकगर्क, अॅरॉन हार्डी, कॅमरुन ग्रीन, जोस हेजलवूड, ट्रेव्हिस हेड, जोस इंग्लिस, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, अॅडम झाम्पा.

Advertisement
Tags :

.