महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जम्मू-काश्मीरमध्ये 2 दहशतवादी ठार

07:00 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजौरीमध्ये सुरक्षा दलाकडून बदला : आणखी एक जवानही हुतात्मा

Advertisement

वृत्तसंस्था /श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीरच्या राजौरी या सीमावर्ती भागात गेले 48 तास चाललेल्या चकमकीत आणखी दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच एक सैनिकही हुतात्मा झाला आहे. आतापर्यंत या चकमकीत एकंदर सात दहशतवादी ठार झाले असून कॅप्टन दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांसह तीन सैनिकांना वीरमरण आले आहे. गुरुवारी ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी 1 पाकिस्तानी असल्याचीही माहिती सेनेच्या प्रवक्त्याने दिली. त्याने नाव क्वारी असे असून त्याला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. क्वारी हा लष्कर-ए-तोयबाचा ज्येष्ठ हस्तक होता. तो गेल्या 10 वर्षांपासून भारताला हवा होता. गेल्या वर्षीपासून तो राजौरी आणि पूंछ भागात पुन्हा कार्यरत झाला होता. तो अत्याधुनिक स्फोटके हाताळण्यात आणि त्यांचे स्फोट घडवून आणण्यात तरबेज होता, असे त्याच्यासंबंधी बोलले जात होते.

एक सैनिक हुतात्मा

गेल्या तीन दिवसांपासून राजौरीमधील डोंगराळ भागात चकमक सुरू आहे. या चकमकीत गुरुवारी आणखी एक सैनिक दहशतवाद्यांशी दोन हात करताना हुतात्मा झाला. राजौरी क्षेत्रातच त्याला दहशतवाद्यांकडून झाडण्यात आलेली गोळी लागली आणि त्याचा रुग्णालयात नेण्यापूर्वी मृत्यू झाल्याचे समजते. त्याच्यासंबंधी अद्याप सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. मात्र, आतापर्यंत दोन कॅप्टन आणि तीन जवान अशा एकंदर पाच जणांना हौतात्म्य प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article