For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोडा येथे चकमकीत 2 सैनिक जखमी

07:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोडा येथे चकमकीत 2 सैनिक जखमी
Advertisement

वृत्तसंस्था /जम्मू

Advertisement

जम्मू-काश्मीरच्या दोडा सीमारेषा भागात दहशतवाद्यांशी अद्यापही भारतीय सेनेची चकमक सुरुच आहे. गुरुवारी या चकमकीत दोन सैनिक जखमी झाले आहेत. जद्दन बाटा खेड्याजवळ ही चकमक झाली. या स्थानी भारतीय सेनेने एक अस्थायी चौकी स्थापन केली होती. तीन ते चार दहशतवाद्यांनी या चौकीवर गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला. गेल्या तीन दिवसांमधील ही तिसरी चकमक आहे. सोमवारी याच जिल्ह्यात चार सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. गेल्या दोन महिन्यांमध्ये सातत्याने येथे दहशतवाद्यांकडून हिंसाचार होत असून त्यात 24 जणांचा बळी पडला आहे. बळी पडलेल्यांमध्ये 10 सैनिक तर 14 दहशतवाद्यांचा समावेश आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. दोडा जिल्ह्यातील देसा आणि आसपासच्या वन प्रदेशांमध्ये दहशतवाद्यांना टिपण्यासाठी भारतीय सेनेच्या दोन तुकड्यांनी जोरदार अभियान चालविले आहे. त्यामुळे सातत्याने चकमकी होत आहेत.

24 घुसखोर आल्याचा दावा

Advertisement

गेल्या दोन महिन्यांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये पाकव्याप्त काश्मीरातून साधारणत: 24 दहशतवादी घुसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरी मिळालेला नाही. मात्र, सर्व शक्यता गृहित धरुन सैनिक कारवाई केली जात आहे. हे घुसखोर पाकिस्तानातील असून त्यांना दहशतवादाचे प्रशिक्षण मिळाले आहे. जम्मूचा हिंदुबहुल भाग हे त्यांचे लक्ष्य असल्याचे बोलले जात आहे.

हिंदूंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न

2024 ची लोकसभा निवडणूक झाल्यापासून जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांनी सातत्याने सीमावर्ती हिंदूबहुल भागांमध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न चालविला आहे. हिंदू नागरिकांनी हा भाग सोडून पलायन करावे, अशी या दहशतवाद्यांची योजना असून त्यामुळे हे हल्ले केले जात आहेत.

9 यात्रेकरुंचाही मृत्यू

गेल्या दोन महिन्यांमध्ये जम्मू भागात शिवखोरी येथील यात्रा करुन परतणाऱ्या भाविकांवरही दहशतवाद्यांनी गोळीबार केला असून 7 यात्रेकरु प्राणास मुकले आहेत. हे यात्रेकरु काश्मीरबाहेरचे आहेत. काश्मीरबाहेरच्या यात्रेकरुंना लक्ष्य करुन संपूर्ण देशात घबराट पसरविण्याचा दहशतवादी संघटनांचा हेतू आहे.

ब्रिजेश थापा यांचे पार्थिव दार्जिलिंगमध्ये

17 जुलैला दोडा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले कॅप्टन ब्रिजेश थापा यांचे पार्थिव त्यांची जन्मभूमी असणाऱ्या दार्जिलिंग येथे आणण्यात आले आहे. दार्जिलिंग जिल्ह्यातील बेंगदुबी या खेड्यात थापा यांचा जन्म झाला होता. या खेड्यात गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisement
Tags :

.