राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ
10:42 AM Oct 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. लवकरच यासंबंधी अधिकृत आदेश जारी होणार आहे. कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सी. एस. षडाक्षरी यांनी मंगळवारी या संदर्भात माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी 1 सप्टेंबर 2025 पासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2 टक्क्यांनी वाढ करण्याच्या फाईलीवर स्वाक्षरी केली आहे. त्याबद्दल आपण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आभार मानत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत हा आदेश जारी होणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
Advertisement
Advertisement