आणखी 2 ‘सुदर्शन’ची पडणार भर
वृत्तसंस्था/मॉस्को
पाकिस्तानसोबत तणावादरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे पुढील आठवड्यात रशियाच्या दौऱ्यावर जाऊ शकतात. या दौऱ्यादरम्यान रशियाकडे ते उर्वरित दोन एस-400 सुरक्षा प्रणाली लवकरच उपलब्ध करण्याची मागणी करू शकतात. मॉस्कोमध्ये 27-29 मेदरम्यान 31 वी इंटरनॅशनल मीटिंग ऑफ हाय रिप्रेझेंटेटिव्ह फॉर सिक्युरिटी इश्यूज होणार आहे. रशियाचे सिक्युरिटी कौन्सिल सेक्रटरी शोइगु याचे अध्यक्षत्व करणार आहेत. भारताने 2018 मध्ये रशियासोबत 5 एस-400 हवाई सुरक्षा प्रणाली खरेदी करण्याचा करार केला होता. हा करार 5.4 अब्ज डॉलर्सचा आहे. यातील तीन एस-400 प्रणाली मिळाल्या आहेत. तर उर्वरित 2 प्रणाली मिळणे बाकी आहे. चौथी हवाई सुरक्षा प्रणाली चालू वर्षाच्या अखेरपर्यंत तर पाचवी प्रणाली पुढील वर्षी मिळण्याचा अनुमान आहे.
परंतु पाकिस्तानसोबत तणावादरम्यान भारत उर्वरित दोन एस-400 प्रणालींचा पुरवठा लवकर इच्छित असल्याचे समजते. रशियासोबत भारताने स्वत:च्या तंत्रज्ञानाची भर घेत याला ‘सुदर्शन’ नाव दिले आहे. पाकिस्तानातील दहशतवादी अ•s भारताने स्ट्राइकद्वारे नष्ट केले होते. यानंतर पाकिस्तानने क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले असता भारताच्या एस-400 यंत्रणेने हे सर्व हल्ले आकाशातच नष्ट केले. पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या सुमारे 300 क्षेपणास्त्रs आणि ड्रोन्सना एस-400 ने आकाशातच नष्ट केले होते. भारतीय वायुदलाने एस-400, आकाश आणि समर क्षेपणास्त्र, बराक-8 मीडियम रेंज सरफेज टू एअर मिसाइलच्या मदतीने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले होते. पाकिस्तानने तुर्कियेचे ड्रोन्स आणि चीनकडुन प्राप्त क्षेपणास्त्रs डागली होती, जी भारताच्या सुरक्षा प्रणालीसमोर कमकुवत ठरली. एस-400 ही जगातील अत्याधुनिक हवाई सुरक्षा प्रणालींपैकी एक आहे.