For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

30 वर्षांमध्ये समुद्रात सामावली सुंदरबनची 2 बेटं

06:05 AM Dec 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
30 वर्षांमध्ये समुद्रात सामावली सुंदरबनची 2 बेटं
Advertisement

भंगादूनी अन् जम्बूद्वीप बेट गिळकृंत : आता या शहरांना धोका

Advertisement

सुंदरबनच्या कांदळवनांना जगातील सर्वात मोठे नैसर्गिक कवच मानले जाते, परंतु हवामान बदलामुळे हे कवच स्वत:च तुटत आहे. 30 वर्षांमध्ये भंगादूनी आणि जम्बूद्वीप यासारखी दोन बेटं जवळपास गायब झाली आहेत. फॉरेस्ट सर्व्हे आाrफ इंडियाच्या (एफएसआय) 2023 च्या अहवालानुसार देशाचे एकूण कांदळवन कव्हर 4,992 चौरसकिमी आहे, परंतु 20217 च्या तुलनेत हे 7.43 चौरस किमीने कमी झाले आहे.

पश्चिम बंगालमध्ये सुंदरबनचा कांदळवनाचा 2 चौरस किमी भाग कमी झाला आहे. तर गुजरातमध्ये 36 चौरस किलोमीटरने हे क्षेत्र कमी झाले आहे. जर हे सत्र सुरू राहिले तर 2050 पर्यंत 113 किनारी शहरांचा हिस्सा समुद्रात सामावू शकतो.

Advertisement

भंगादूनी अन् जम्बूद्वीप

सुंदरबनच्या दक्षिण टोकावर वसलेल्ल्या भंगादूनी बेटाची कहाणी अत्यंत वेदनादायी आहे. 1975 मध्ये सर्व्हे ऑफ इंडियाच्या नकाशात हे एक हिरवेगार कांदळवनाने युक्त बेट होते. लँडसॅट-2 उपग्रहाने याचे छायाचित्र काढले होते. परंतु 1991 मध्ये लँडसॅट-5ने बेट आंकुचित पावल्याचे दाखवून दिले होते. सागरी लाटा आणि मीठ जमा झाल्याने कांदळवनाची मूळं कमकुवत झाली. 2016 पर्यंत लँडसॅट-8 च्या छायाचित्रांमध्ये हे 1975 च्या आकाराच्या निम्मे राहिले. 1991-2016 मध्ये 23 चौरस किलोमीटर क्षेत्र समुद्रात सामावल्याचे एफएसआयचे अधिकारी अनुपम घोष यांनी सांगितले.

जम्बूद्वीपाची स्थितीही अशीच आहे. 1991 च्या छायाचित्रांमध्ये हे मोठे होते, परंतु 2016 पर्यंत याचा आकार कमी होण्यासोबत जागाही बदलली आहे. खालील हिस्सा लाटांसोबत खचला. 2024-25 च्या उपग्रहीय डाटा (नासा आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ)मधून सुंदरबनमध्ये वार्षिक 3 सेंटीमीटरपर्यंत जमीन बुडत असल्याचे कळते, हे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा दुप्पट आहे.

शास्त्राrय कारण

मुख्य कारण हवामान बदलामुळे सागराची पातळी वाढणे आहे. आयपीसीसीच्या 2023 च्या अहवालानुसार जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राचे पाणी फैलावत आहे, थर्मल एक्सपॅन्शन आणि हिमालयाचा बर्फ वितळ आहे. सुंदरबनमध्ये सागराची पातळी वार्षिक 3.9 मिलीमीटरने वाढतेय. तर जागतिक प्रमाणापेक्षा (1.7 मिमी) हे प्रमाण दुप्पट आहे. मिठाचा वाढता सतर (सलाइनिटी) कांदळवनांच्या मूळांना नष्ट करत आहे.

समुद्राचा स्तर वृद्धी (एसएलआर) : 2100 पर्यंत 62-87 सेमी वाढ (आयएसीओआयएस 2025 अहवाल)

किनारी क्षरण (इरोजन) : 97 टक्के किनाऱ्याची धूप होतेय. 1969-2001 मध्ये 163 चौरस किमी भूमी गायब (जादवपूर विद्यापीठ अध्ययन)

मानवीय हालचाली : धरणांमुळे गंगा-ब्रह्मपुत्रेचे पाणी कमी, मासेमारीच्या जाळ्यांमुळे कांदळवने नष्ट.

चक्रीवादळ : 2019-24 मध्ये फानी, अम्फान, यास यासारख्या चक्रीवादळांमुळे 40 हजार घरे नष्ट.

शास्त्राrय स्वरुपात कांदळवन कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, परंतु 20 टक्के कमीमुळे हवामान चक्र बिघडत आहे.

एफएसआय 2023 चा अहवालातून कांदळवनांची स्थिती

एकूण कांदळवन : 4992 चौरस किमी (0.15 टक्के देशाचे क्षेत्र)

कमी : 2021 च्या तुलनेत 7.43 चौरस किमी कमी, गुजरातमध्ये (-36.39), अंदमान (-4.65), पश्चिम बंगाल (-2)

वृद्धी : आंध्रप्रदेश (13), महाराष्ट्र (12), ओडिशा (8)

सुंदरबन : 25 वर्षांमध्ये 4 बेटं (बेडफोर्ड, लोहाचारा, कबासगादी, दक्ष्णि तलपत्ती) पूर्णपणे गायब

2024-25 अपडेट (डाउन टू अर्थ) : सुंदरबनमध्ये वार्षिक 3 सेंटीमीटरने पाणीपातळी वाढतेय. मूसुनी बेटाचा 15 टक्के हिस्सा 2023 पर्यंत गायब होणार

भारताची आणखी किती बेटं धोक्यात

भारताच्या 102 बेटांनी युक्त सुंदरबनमध्ये यापूर्वीच 4 बेटं गायब झाली आहेत. डब्ल्यूडब्ल्यूएफ-आयएनसीओआयएस 2025 नुसार खालील भाग धोक्यात आहेत...

सुंदरबनमध्ये : घोरामारा, मूसुनी, सागर (30 चौरसकिमी गमावला), 15 टक्के क्षेत्र 2030 पर्यंत बुडण्याची शक्यता

अन्य बेट/क्षेत्र : अंदमान-निकोबार (1 चौरसकिमीने कांदळवनात घट), लक्षद्वीपचे कनिष्ठ बेट

किनारी शहर : 113 शहरे 2050 पर्यंत जोखिमीत (आयडीआर 2024)- गुजरात (भावनगर 87 सेमी एसएलआर), केरळ (कोची), आंध (विशाखापट्टणम 62 सेमी), मुंबई, कोलकाता, चेन्नई. 1500 चौरस किमी जमीन 2050 पर्यंत क्षरणामुळे गायब (डब्ल्यूआरआय)

Advertisement
Tags :

.