For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दीपिका कुमारीला 2 सुवर्ण

06:35 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
दीपिका कुमारीला 2 सुवर्ण
Advertisement

आशिया कप तिरंदाजी : भारताने 10 सुवर्णांसह 14 पदके

Advertisement

वृत्तसंस्था/ बगदाद

माजी जागतिक अग्रमानांकित महिला तिरंदाज दीपिका कुमारीने 14 महिन्यानंतर पुनरागमन करताना येथे झालेल्या आशिया चषक लेग 1 तिरंदाजी स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. भारताने या स्पर्धेत एकूण 14 पदके मिळविली.

Advertisement

या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारतीय तिरंदाजांनीच पूर्ण वर्चस्व गाजविता सर्व सातही सुवर्णपदके पटकावली. याशिवाय भारताने तीन रौप्यपदकेही मिळविली. भारताने स्पर्धेअखेर एकूण 10 सुवर्ण, 3 रौप्य व 1 कांस्यपदक मिळविले. तीन ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या दीपिकाने रिकर्व्ह माहिलांच्या अंतिम फेरीत आपल्याच देशाच्या सिमरनजीत कौरचा 6-2 असा पराभव केला. जून 2022 नंतर तिचे हे पहिलेच जेतेपद आहे. वर्ल्ड कप चॅम्पियनशिप 3 मध्ये तिने शेवटचे पदक मिळविताना सांघिक रौप्यपदक जिंकले होते.

येथे तिने सांघिक विभागातही चुरशीच्या लढतीत उझ्बेकवर 5-4 असा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी केली. रिकर्व्ह पुरुषांच्या संघाने व मिश्र संघाने आणखी दोन सुवर्णपदके पटकावली. पुरुष संघाने बांगलादेशचा 6-0 असा एकतर्फी धुव्वा उडविला तर मिश्र संघाने 6-2 असा विजय मिळविला. धीरज बोम्मदेवराने पुरुष विभागाचे जेतेपद पटकावले. त्याने आपल्याच देशाच्या तरुणदीप रायचा 7-3 असा पराभव केला.

प्रथमेश जावकरने कंपाऊंड वैयक्तिक विभागात जेतेपद पटकावताना आपलाच संघसहकारी कुशल दलालचा 146-144 असा पराभव केला. परमीत कौरने इराणच्या फतेमेह हेम्मतीचा 138-135 असा पराभव करून महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये सुवर्ण घेतले.

Advertisement
Tags :

.