महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोणावळ्यात 2 मुलींचे अपहरण करून अत्याचार; 9 जणांवर गुन्हा

01:54 PM Sep 24, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

लोणावळा : लोणावळा रेल्वे स्टेशन परिसरातून दोन मुलींचे अपहरण करुन त्यांना लोणावळ्यातील हनुमान टेकडी येथे एका घरात डांबून त्यांच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका पीडित मुलीने तर दुसऱ्या पीडित मुलीच्या आईने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

पहिल्या घटनेतील पीडित महिला ही मूळची कळंब उस्मानाबाद येथील आहे. ती लोणावळा रेल्वे स्टेशनजवळ उभी असताना तिला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पळवून नेत हनुमान टेकडी येथील क्रांतीनगर येथील एका घरात साखळीने बांधून ठेवले. उष्टे अन्न खायला घातले. तसेच काम न केल्यास हाताने, पक्कडीने, सळईने मारहाण केली. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद पीडित मुलीच्या आईने दिली आहे. या फिर्यादीवरून बेताल आनंद पवार (सलट), मंदा बेताल पवार (सलट), संजना बबलू पवार (ठाकूर), बबलू पवार (ठाकूर), अर्चना बेताब पवार (सलट), किरण बेताब पवार (सलट), मोनिका बेताब पवार, राज सिध्देश्वर शिंदे व करीना राज शिंदे (सर्व राहणार क्रांतीनगर, हनुमान टेकडी, लोणावळा) याच्या विरुद्ध भादवी कलम 376 (2)(एन), 363, 344, 324, 323, 504, 506, 34 पोस्को कलम 4,6,8,10,12 जे.जे. ऍक्ट कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

दुसऱ्या घटनेत पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. सदरची मुलगी ही जाफरनगर, उत्तरप्रदेश भागातील आहे. ती लोणावळा रेल्वे स्टेशन परिसरात एका दुकानासमोर उभी असताना पंधरा दिवसांपूर्वी तिचे काही जणांनी अपहरण करुन तिला हनुमान टेकडी येथील एका घरात डांबून ठेवले. त्यानंतर तिला मारहाण करत जखमी करण्यात आले. दरम्यान, दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिचा मोबाईल देखील काढून घेण्यात आला आहे. तिने दिलेल्या फिर्यादीवरून करीना राज शिंदे, मंदाकिनी बेताब पवार, संजना बबलू ठाकूर, बबलू पवार, राज सिद्धेश्वर पवार, बेताब आनंद पवार, ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे (सर्व राहणार क्रांतीनगर, हनुमान टेकडी, लोणावळा) यांच्या विरुद्ध भादवी कलम 376 (ड), 376 (2) (ऱ), 394, 344, 363, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही घटनांचा तपास लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिताराम डुबल हे तपास करत आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews
Next Article